एक्स्प्लोर

IPL 2020 : मुंबईच्या अडचणींमध्ये वाढ; रोहित शर्मा पुढच्या सामन्यातही संघाबाहेर राहण्याची शक्यता

IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा स्टार कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे गेल्या काही सामन्यांपासून संघाची जबाबदारी पोलार्डच्या खांद्यावर आहे.

IPL 2020 : रविवारी मुंबई इंडियन्सचा राजस्थान रॉयल्सने 8 विकेट्सनी पराभव केला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सची समस्यांमध्ये आणखी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. संघाचा स्टार कर्णधार रोहित शर्मा सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे गेल्या काही सामन्यांपासून संघाचं नेतृत्त्व पोलार्ड करत आहे. अशातच मुंबई इंडियन्सच्या संघासाठी सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, दुखापतीमुळे मुंबईच्या पुढच्या सामन्यातही रोहित शर्माच्या संघवापसीची अपेक्षा फार कमी आहे. तसेच मुंबई इंडियन्सच्या वतीने रोहित शर्माच्या दुखापतीसंदर्भात कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'रोहित शर्मा हॅमस्ट्रिंग इंज्युरीमधून अद्याप बरा होऊ शकलेला नाही. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पोलार्डच्या खांद्यांवर गेल्या दोन सामन्यांपासून कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर ईशाक किशन ओपनिंग बॅट्समनची जबाबदारी सांभाळत आहे.'

संघाचा स्टार खेळाडू डी कॉकला रविवारी रोहित शर्माच्या दुखापतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. डी कॉक म्हणाला की, 'रोहित शर्मा कधी संघात परत येणार यासंदर्भात आम्ही आता काहीच सांगू शकत नाही. तुम्हाला एवढंच सांगू शकतो की, रोहित शर्माच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.'

न्यूझिलंड दोऱ्यातही झाली होती दुखापत

दरम्यान, रोहित शर्माने या सीझनमध्ये आपल्या खराब फिटनेसमुळे निशाण्यावर आहे. लॉकडाऊन दरम्यान रोहित शर्माचं वजन फारचं वाढलं होतं. त्यामुळे माजी सलामीवीर वीरेंद्र सेहेवागने रोहितला टोला लगावत 'वडा पाव' असंही म्हटलं होतं.

यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच रोहित शर्मा दुखापतीमुळे त्रस्त आहे. रोहित शर्माला न्यूझीलंड विरोधात फेब्रुवारीमध्ये शेवटच्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळेच टेस्ट सीरिजमध्येही तो सहभागी होऊ शकला नव्हता. आयपीएलमध्ये रोहित शर्माने जवळपास 6 महिन्यांनी मैदानावर वापसी केली होती.

धोनीच्या सीएसकेला मोठा धक्का; पहिल्यांदाच प्लेऑफमधून बाहेर

पहिल्यांदाच चेन्नई प्लेऑफमधून बाहेर

इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा संघ फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. रविवारी सीएसकेने आरसीबीला 8 विकेट्सनी मात दिली. परंतु, चेन्नईला मिळालेला हा विजय संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यासाठी पुरेसा नव्हता. रविवारच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्स विरोधात विजय मिळवला. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं चेन्नईचं आव्हान संपुष्टात आलं. त्यामुळे धोनीच्या नेतृत्त्वात खेळणारा चेन्नईचा संघ आयपीएलच्या 13 व्या सीझनमध्ये प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेलेला पहिला संघ आहे.

IPL 2020 : प्ले-ऑफ सामन्यांचं वेळापत्रक जाहीर; अशा होणार लढती

प्ले-ऑफ सामन्यांचं वेळापत्रक जाहीर यंदा कोरोनामुळे बीसीसीआयकडून आयपीएलचं आयोजन यूएईत करण्यात आलं आहे. 19 सप्टेंबरला सुरु झालेली ही स्पर्धा 10 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक जेव्हा जाहीर करण्यात आले होते, तेव्हा प्लेऑफच्या सामन्यांची ठिकाणं आणि तारखी सांगण्यात आलेल्या नव्हत्या. पण आज BCCIने या सामन्यांचे वेळापत्रक अधिकृत ट्विटर हँडलवरून जाहीर केलं. त्यामुळे आयपीएलच्या तेराव्या मोसमातं आता खऱ्या अर्थाने रंगत यायाला सुरुवात झाली आहे. महत्त्वाच्या बातम्या : 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget