एक्स्प्लोर

IPL 2020 : हिरव्या रंगाची जर्सी RCB साठी अनलकी! का घातली जाते ही जर्सी?

IPL 2020 : विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ काल हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरला. हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये ज्यावेळी मैदानात उतरला आहे, त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

IPL 2020 : कालच्या सामन्यात बंगलोरचा आठ विकेट्सनी पराभव करुन बाद फेरी चेन्नईनं गाठण्याच्या पुसटशा आशा जिवंत ठेवल्या आहेत. चेन्नईचा यंदाच्या मोसमातला हा चौथा विजय ठरला. या सामन्यात बंगलोरनं चेन्नईसमोर विजयासाठी 146 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. चेन्नईनं हे आव्हान आठ चेंडू बाकी ठेऊन पूर्ण केलं.

विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ आज हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरला. आयपीएलच्या मैदानात दरवर्षी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी बंगलोरच्या संघातील खेळाडू एका सामन्यात ही हिरवी जर्सी परिधान करतात. यंदाही बंगलोरनं चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ही परंपरा कायम राखली.  बेंगलोरचा यंदाचा हा चौथा पराभव होता. तर हिरव्या रंगाच्या जर्सीमधला आणखी एक पराभव.  2016 पासून बेंगलोरचा संघ हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये ज्यावेळी मैदानात उतरला आहे, त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.  या हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये बेंगलोर आजवर 10 सामने खेळला आहे, यात फक्त दोनदा त्यांना विजय मिळाला आहे. तरीही प्लेऑफसाठी प्रवास सोपाच कालच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सल हरवून प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी बेंगलोरकडे होती. 14 गुणांसह RCB आता तिसऱ्या स्थानावर आहे. प्ले ऑफमधील स्थान पक्कं करण्यासाठी एका विजयाची आवश्यकता बेंगलोरला आहे.  बेंगलोरसाठी तसंही प्लेऑफचा रस्ता अवघड नाही. उरलेल्या तीन सामन्यांपैकी एका सामन्यात त्यांना विजय मिळवायचा आहे. तसंच एकही विजय नाही मिळवला तर माक्ष त्यांना इतर संघांच्या विजय-पराभवावर निर्भर राहावं लागणार आहे.

IPL 2020 MI vs RR : राजस्थानचा मुंबईवर 8 गडी राखून विजय; स्टोक्स-सॅमसन विजयाचे शिल्पकार

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची विजयी खेळी चेन्नईच्या बंगलोरविरुद्धच्या कालच्या विजयात सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि अंबाती रायुडूनं महत्वाची भूमिका बजावली. गेल्या चार सामन्यात फारशी चुणूक न दाखवलेल्या ऋतुराजनं आज मात्र जबाबदार खेळी केली. त्यानं 51 चेंडूत नाबाद 65 धावांचं योगदान दिलं. त्याच्या या खेळीत चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. ऋतुराजनं अंबाती रायुडूसह दुसऱ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी रचली. रायुडूनंही 27 चेंडूत 3  चौकार आणि 2 षटकारांसह 39 धावा फटकावल्या. रायुडू बाद झाल्यानंतर धोनीनं ऋतुराजच्या साथीनं विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. बंगलोरची संथ खेळी त्याआधी कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकानंतरही बंगलोरला 20 षटकात 6 बाद 145 धावांचीच मजल मारता आली. विराटनं 43  चेंडूत 1 चौकार आणि एका षटकारासह 50 धावांची खेळी केली. तर एबी डिव्हिलियर्सनं 36 चेंडूत 4 चौकारांसह 39 धावा केल्या. याशिवाय बंगलोरच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चेन्नईकडून सॅम करननं प्रभावी मारा करताना तीन षटकात 19 धावा देत 3 फलंदाजांना माघारी धाडलं. तर दीपक चहरनं दोन आणि मिचेल सँटनरनं एक विकेट घेतली. विराटचं षटकारांचं द्विशतक चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं आपल्या आयपीएल कारकीर्दीतला 200वा षटकार ठोकला. रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर पुढे सरसावत विराटनं हा विक्रमी षटकार ठोकला. अशी कामगिरी करणारा विराट हा आजवरचा पाचवा खेळाडू ठरला. याआधी आयपीएलच्या मैदानात ख्रिस गोल (336), एबी डिव्हिलियर्स (231), महेंद्रसिंग धोनी (216) आणि रोहित शर्मानं (209) दोनशे पेक्षा जास्त षटकार ठोकण्याचा पराक्रम गाजवला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
Embed widget