IPL 2020 | धोनीच्या सीएसकेला मोठा धक्का; पहिल्यांदाच प्लेऑफमधून बाहेर
IPL 2020 : आयपीएलमध्ये चेन्नईने एकूण 12 सामने खेळले असून त्यापैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 8 सामन्यांमध्ये चेन्नईचा पराभव झाला आहे.
IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा संघ फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. रविवारी सीएसकेने आरसीबीला 8 विकेट्सनी मात दिली. परंतु, चेन्नईला मिळालेला हा विजय संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यासाठी पुरेसा नव्हता. रविवारच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्स विरोधात विजय मिळवला. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं चेन्नईचं आव्हान संपुष्टात आलं. त्यामुळे धोनीच्या नेतृत्त्वात खेळणारा चेन्नईचा संघ आयपीएलच्या 13 व्या सीझनमध्ये प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेलेला पहिला संघ आहे.
आयपीएलमध्ये चेन्नईने एकूण 12 सामने खेळले असून त्यापैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 8 सामन्यांमध्ये चेन्नईचा पराभव झाला आहे. आता जर धोनीच्या संघाने बाकी असलेल्या दोन सामन्यांमध्येही विजय मिळवला, तरिदेखील चेन्नईच्या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची कोणतीही संधी नाही.
Thank you for standing by us through everything. #WeShallPlayOn 🦁💛#WhistlePodu #Yellove #WhistleFromHome pic.twitter.com/5XpNTgZDh3
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 25, 2020
चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने मुंबई इंडियन्स विरोधातील सामन्यांतच मान्य केलं होतं की, आता सीएसकेचा संघ यंदाच्या सीझनमध्ये प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकणार नाही. दरम्यान, आतापर्यंतच्या आयपीएलच्या सर्व सीझनपैकी यंदा पहिल्यांदाच सीएसकेचा संघ प्लेऑफमध्येही जागा निर्माण करू शकणार नाही.
आयपीएलमध्ये 2011 पासून प्लेऑफला सुरुवात झाली. त्यानंतर सीएसके दरवर्षी प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी यशस्वी होत होती. दरम्यान, 2016 आणि 2017 सीझनमध्ये संघावर बंदी घातल्यामुळे सीएसके आयपीएलमध्ये खेळू शकली नव्हती.
सीएसके बाहेर गेल्यानंतर राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाबसाठी प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी एक शेवटची संधी आहे. परंतु, या तिनही संघांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी उरलेले सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.
प्ले-ऑफ सामन्यांचं वेळापत्रक जाहीर
यंदा कोरोनामुळे बीसीसीआयकडून आयपीएलचं आयोजन यूएईत करण्यात आलं आहे. 19 सप्टेंबरला सुरु झालेली ही स्पर्धा 10 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक जेव्हा जाहीर करण्यात आले होते, तेव्हा प्लेऑफच्या सामन्यांची ठिकाणं आणि तारखी सांगण्यात आलेल्या नव्हत्या. पण आज BCCIने या सामन्यांचे वेळापत्रक अधिकृत ट्विटर हँडलवरून जाहीर केलं. त्यामुळे आयपीएलच्या तेराव्या मोसमातं आता खऱ्या अर्थाने रंगत यायाला सुरुवात झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :