IPL 2020 : चेन्नईवर मात करत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली कोलकाताची टीम; पॉईंट टेबलमध्येही मोठे बदल
IPL 2020 : आयपीएलमध्ये काल रंगलेल्या चेन्नई विरूद्ध कोलकाताच्या सामन्यानंतर पॉइंट टेबलची समीकरणं बदलंली आहेत. चेन्नईवर मात करून मिळवलेल्या विजयामुळे कोलकाताला पॉइंट टेबलमध्ये फायदा झाला आहे.
IPL 2020, KKR vs CSK : आयपीएल 2020 च्या 21व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सचा 10 धावांनी पराभव केला. या सीझनमधील कोलकाताचा हा तिसरा विजय आहे तर धोनीच्या संघाचा हा चौथा पराभव आहे. चेन्नईवर मात करून मिळवलेल्या विजयामुळे कोलकाताला पॉइंट टेबलमध्ये फायदा झाला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, केकेआर सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचसोबत त्यांचा नेट रन रेटही प्लसमध्ये आहे.
आयपीएलच्या या सीझनमध्ये कोलकाताने आतापर्यंत पाच सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच सहा गुणांसह त्यांचा नेट रन रेट +0.002 आहे. तसेच चेन्नईच्या संघ पॉइंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचसोबत त्यांचा नेट रन रेटही नेगेटिव्ह आहे.
चेन्नईने आतापर्यंत या सीझनमध्ये सहा सामने खेळले आहेत. ज्यामध्ये दोन सामन्यांमध्ये विजय मिळाला असून चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच चेन्नईचा नेट रन रेट -0.371 एवढा आहे.
A look at the Points Table after Match 21 of #Dream11IPL pic.twitter.com/ksUXUjOKdC
— IndianPremierLeague (@IPL) October 7, 2020
पहिल्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स
यंदाच्या आयपीएलमध्ये चार सामने जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईच्या पारड्यात आठ गुण आहेत, तसेच त्यांचा नेट रन रेटही +1.488 इतका आहे. जो सर्वच संघांच्या तुलनेत उत्तम आहे. पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सनेही चार सामने जिंकले आहेत. परंतु, त्यांचा नेट रन रेटमध्ये मागे असल्यामुळे हा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सर्वात शेवटच्या स्थानावर आहे किंग्स इलेव्हन पंजाब
पॉइंट टेबलमध्ये सर्वात खालच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ आहे. या सीझनमध्ये पंजाबने आतापर्.यंत पाच सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना एका सामन्यात विजय मिळाला असून इतर चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, त्यांचा नेट रन रेट प्लसमध्ये आहे. पंजाबचा नेट रन रेट +0.178 एवढा आहे.
सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेला राजस्थानचा संघ पॉइंट टेबलमध्ये सातव्या आणि सनरायझर्स हैदराबाद सहाव्या क्रमांकावर आहे. याव्यतिरक्त पाचपैकी तीन सामने जिंकणारा बंगलोरचा संघ पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
KKR vs CSK IPL 2020 : कोलकाताचा चेन्नई सुपरकिंग्ज वर 10 धावांनी विजय; धोनीच्या टीमचा चौथा पराभव