DC vs SRH, Pitch Report : आज दिल्लीकरांची लढत हैदराबादशी; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?
आयपीएलमध्ये(IPL 2022) आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडणार असून पुढील फेरीत एन्ट्रीसाठी दोघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा आहे.
DC vs SRH, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनराजयजर्स हैदराबाद (DC vs SRH) या दोन्ही संघात सामना पार पडणार आहे. हैदराबादने आतापर्यंत 9 पैकी 5 सामने जिंकत पाचवं स्थान मिळवलं आहे. तर दिल्लीचा संघ मात्र 9 पैकी 4 सामनेच जिंकला असल्याने सातव्या स्थानी आहे. त्यामुळे दोघांचीही पुढील फेरीत पोहचण्याची शक्यता समसमान असल्याने आजचा सामना जिंकणं दोघांसाठी अत्यंत महत्वाचं असेल.
आयपीएलमध्ये आजवर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Delhi Capitals vs sunrisers hyderabad) हे संघ तब्बल 20 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता हैदराबादचं (SRH) पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 11 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दिल्लीने (DC) 9 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. यंदा दोघांचाही फॉर्म समसमान असल्याने आजचा सामना चुरशीचा होऊ शकतो हे नक्की. दरम्यान आतापर्यंतच्या सामन्यांत खेळाडूंच्या फॉर्मचा विचार करता कोणत्या 11 (Probable 11) खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष असेल ते पाहूया...
दिल्ली विरुद्ध हैदराबाद अशी असेल ड्रीम 11 (DC vs SRH Best Dream 11)
विकेटकीपर- ऋषभ पंत,निकोलस पूरन
फलंदाज- डेव्हिड वॉर्नर, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी,
ऑलराउंडर- लियाम लिव्हिंगस्टोन, राहुल तेवतिया, राशिद खान
गोलंदाज- उम्रान मलिक, टी. नटराजन, कुलदीप यादव
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना आजचा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न मैदानात पार पडणार आहे. त्यात सामना संध्याकाळी असल्याने दव पडण्याची शक्यता अधिक आहे. दव पडल्यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना मोठ्या अडचणी येतात. त्यामुळे आजच्या सामन्यापूर्वी नाणेफेक जिंकणारा संघ नक्कीच आधी गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेऊ शकतो.
हे देखील वाचा-
- RCB vs CSK, Top 10 Key Points : बंगळुरुचा चेन्नईवर 13 धावांनी विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- ICC Rankings: टी-20 मध्ये भारत नंबर वन! कसोटी आणि वनडेमध्ये टीम इंडिया कितव्या क्रमांकावर?
- IPL 2022 : लिव्हिंगस्टोनचा गुजरातविरुद्ध अफलातून षटकार; राशिदनं जाऊन चक्क लियामची बॅट तपासली, पाहा फोटो