Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: हार्दिकच्याआधी अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती नताशा; पुढे नेमकं काय घडलं?, वाचा Inside Story
Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: हार्दिक आणि नताशा यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (Natasha Stankovic) यांचा घटस्फोट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हार्दिक आणि नताशाने याबाबत अधिकृत माहिती दिली नसली, तरी दोघांच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधाण आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
हार्दिक आणि नताशा यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्वी नताशा तिचे नाव नताशा स्टॅनकोविक पांड्या असे ठेवायची, पण आता तिने तिचे नाव पूर्णपणे काढून टाकले आहे. 4 मार्च रोजी नताशाचा वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या दिवशी देखील हार्दिक पांड्याने कोणतीही पोस्ट देखील केली नाही. नताशाने तिच्या आणि हार्दिकच्या अलीकडील सर्व पोस्ट डिलीट केल्या. याशिवाय नताशा यावेळी आयपीएल मॅच पाहायलाही आली नाही. तसेच नताशाने मुंबई इंडियन्सच्या समर्थनार्थ काहीही पोस्ट केली नाही.
हार्दिकआधी नताशा एली गोनीसोबत होती रिलेशनशिपमध्ये-
हार्दिक पांड्यापूर्वी नताशा स्टॅनकोविच टीव्ही अभिनेता एली गोनीसोबत (Aly Goni) रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही जवळपास एक वर्ष एकमेकांना डेट करत होते. पण त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. एलीने स्वतः त्याच्या ब्रेकअपच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. नताशा आणि एली 2014 मध्ये रिलेशनशिपमध्ये होते. पण एका वर्षानंतर एलीने सांगितले होते की, वेगवेगळ्या संस्कृतींमुळे दोघे वेगळे झाले आहेत. मला एका भारतीय मुलीसोबत राहायचे आहे, असे एली गोनीने सांगितले होते.
हार्दिकला नताशा कशी भेटली?
हार्दिक आणि नताशा 2020 मध्ये विवाहबद्ध झाले. लग्नाआधी हार्दिक आणि नताशा एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. नताशा सर्बियन मॉडेल आहे. अभिनेत्री होण्याचे स्वप्न घेऊन ती आपला देश सोडून भारतात आली. भारतात आल्यानंतर नताशाने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय ती अनेक रिॲलिटी शोमध्येही दिसली. नताशा आणि हार्दिकची पहिली भेट एका नाईट क्लबमध्ये झाली होती. त्यांच्या पहिल्या भेटीत नताशाला हार्दिक कोण आहे याची कल्पना नव्हती. पण हार्दिकच्या बोलण्याने नताशाचे मन जिंकले.