Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: हार्दिकच्या घटस्फोट प्रकरणात कृणाल पांड्याची एन्ट्री; नताशाच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष
Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: हार्दिक आणि नताशा यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (Natasha Stankovic) यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान सोशल मीडियावर एक नवीन अपडेट समोर आली आहे. हार्दिक पांड्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने हार्दिक पांड्याचा मुलगा अगस्त्य आणि मुलगा कवीर दिसत आहे. या फोटोवर नताशा स्टॅनकोविकने या फोटोवर कमेंट केली आहे. हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या असताना कृणालने फोटो शेअर केल्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
View this post on Instagram
नेमकं प्रकरण काय?
हार्दिक आणि नताशा यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्वी नताशा तिचे नाव नताशा स्टॅनकोविक पांड्या असे ठेवायची, पण आता तिने तिचे नाव पूर्णपणे काढून टाकले आहे. 4 मार्च रोजी नताशाचा वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या दिवशी देखील हार्दिक पांड्याने कोणतीही पोस्ट देखील केली नाही. नताशाने तिच्या आणि हार्दिकच्या अलीकडील सर्व पोस्ट डिलीट केल्या. याशिवाय नताशा यावेळी आयपीएल मॅच पाहायलाही आली नाही. तसेच नताशाने मुंबई इंडियन्सच्या समर्थनार्थ काहीही पोस्ट केली नाही.
नताशाची पोस्ट चर्चेत-
नताशा स्टॅनकोविकनं वाहतूक चिन्हांचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला ठेवला असून त्यावर कुणीतरी रस्त्यावर येणार अशा आशयाचं इंग्रजी वाक्य ठेवलं होतं.
2024 वर्ष हार्दिक पांड्यासाठी वादग्रस्त-
हार्दिक पांड्याचे गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्सकडे जाणे वादग्रस्त ठरले. मुंबई इंडियन्सने अचानक रोहित शर्माला कोणतीही सूचना न देता कर्णधारपदावरून हटवले आणि पांड्या कर्णधार म्हणून मुंबई फ्रँचायझीमध्ये परतला. मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवर देखील या निर्णयाचा परिणाम झाला, कारण एका तासात ट्विटरवर मुंबई इंडियन्सचे 400,000 फॉलोअर्स कमी झाले. तेव्हापासून पांड्यावर मैदानावर आणि मैदानाबाहेरच्या कामगिरीवर टीका होत आहे.
हार्दिक पांड्या किती कमावतो?
पांड्या आयपीएल टीम मुंबई इंडियन्सचा भाग आहे. त्याला संघाकडून फी म्हणून 15 कोटी रुपये मिळतात. यापूर्वी तो गुजरात टायटन्सचा भाग होता. गुजरातचा संघही पांड्याला तेवढीच रक्कम द्यायचा. यासोबतच त्याला भारतीय क्रिकेट संघाकडून मॅच फी देखील मिळते. पांड्याची कमाई करोडोंमध्ये आहे.
वडोदरा आणि मुंबईत करोडोंची घरं-
हार्दिक पांड्याने मुंबईत एक अपार्टमेंट घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी हे घर 30 कोटी रुपयांना विकत घेतले होते. यासोबतच त्यांचे वडोदरा येथे पेंटहाऊस आहे. त्याची किंमतही करोडोंमध्ये आहे. हार्दिक पांड्या विविध ब्रँडच्या जाहिरातींमधून सुमारे 55-60 लाख रुपये कमावतो. हार्दिकने Halaplay, Gulf Oil, Star Sports, Gillette, Jaggle, Sin Denim, D:FY, Boat, Oppo, Dream11, Reliance Retail, Villain आणि SG क्रिकेटला मान्यता दिली आहे.