Hardik Pandya : नताशाला 70 टक्के संपत्ती द्यावी लागण्याच्या चर्चा पण हार्दिकची हुशारी कामी येणार, संपत्ती वाचणार? जुना व्हिडीओ व्हायरल
Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरु आहेत.
![Hardik Pandya : नताशाला 70 टक्के संपत्ती द्यावी लागण्याच्या चर्चा पण हार्दिकची हुशारी कामी येणार, संपत्ती वाचणार? जुना व्हिडीओ व्हायरल Hardik Pandya Natasa Stankovic divorce crisis Hardik old video viral where he said all property on mothers name marathi news Hardik Pandya : नताशाला 70 टक्के संपत्ती द्यावी लागण्याच्या चर्चा पण हार्दिकची हुशारी कामी येणार, संपत्ती वाचणार? जुना व्हिडीओ व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/25/fa6de3265610ef78e84d546a4f7c07631716639935144989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : भारताच्या टी-20 संघाचा उपकर्णधार आण मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. नताशा स्टॅनकोविकनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या नावातील पांड्या हे नाव हटवल्यानंतर तर्क वितर्क सुरु झाले आहेत. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांचा घटस्फोट झाल्यास पांड्याला नताशाला 70 टक्के संपत्ती द्यावी लागेल, असे दावे केले जात आहेत. हे दावे सुरु असतानाच हार्दिक पांड्याचा जुना एक व्हिडीओ व्हायरल होतं.
मला 50 टक्के कुणाला द्यायचं नाही...
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. हार्दिकला नताशाला 70 टक्के संपत्ती द्यावी लागेल, अशी चर्चा सुरु आहेत. आता हार्दिक पांड्याचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये हार्दिक पांड्या गौरव कपूर सोबतचर्चा करत आहे. हार्दिक पांड्या म्हणतोय की,'सर्व आईच्या नावावर आहे, कारपासून घरापर्यंत सर्व काही, माझा काही भरवसा नाही, मी माझ्या नावावर घेणार नाही,मला पुढे जाऊन 50 टक्के कुणाला द्यायचं नाही.
Hardik pandya is a smart man.. he knew about this divorce thing can happen with Natasha #Hardikpandya pic.twitter.com/f8BxqMd9bI
— भाई साहब (@Bhai_saheb) May 25, 2024
नताशा स्टॅनकोविकनं हार्दिकचं नाव हटवलं
सर्बियाची मॉडेल असलेल्या नताशा स्टॅनकोविकनं हार्दिक पांड्यासोबत लग्न केलं होतं. नताशा स्टॅनकोविकनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटमधील नावातून हार्दिक पांड्यांचं नाव हटवलं आहे. यामुळ हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यात आलबेल नसल्याच्या चर्चा वाढल्या. आयपीएलच्या 17 व्या पर्वात नताशा स्टॅनकोविक हार्दिकला पाठिंबा देण्यासाठी एकाही मॅचला उपस्थित नव्हती.
व्हलेंटाइन डे नंतर नताशा स्टॅनकोविकनं तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसवर हार्दिक पांड्यासोबतचा फोटो शेअर केलेला नाही. नताशाच्या वाढदिवशी हार्दिक पांड्यानं तिला सदिच्छा देखील दिल्या नव्हत्या अशा चर्चा आहेत. त्यामुळं हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत.
हार्दिक पांड्याकडे बॅडपॅचमधून बाहेर पडण्याची संधी
मुंबई इंडियन्सचं कॅप्टनपद मिळाल्यानंतर हार्दिक पांड्याला दमदार कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियन्सचा संघ देखील आयपीएलमध्ये दहाव्या स्थानी राहिला. आता आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये कमबॅक करण्याची संधी हार्दिक पांड्याकडे आहे. हार्दिक पांड्याला टीम इंडियाचा उपकॅप्टन करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)