Hardik Pandya : IPL 2022 पूर्वी हार्दिक करतोय मजा-मस्ती, लेकासोबत पूलमध्ये मजा करतानाचा व्हिडीओ केला शेअर
Hardik Pandya : आयपीएलच्या आगामी सीजनमध्ये हार्दिक पांड्या अहमदाबाद या नव्या संघाचा कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे.
Hardik Pandya : मागील बऱ्याच काळापासून टीम इंडिया (Team India) मधून बाहेर असणारा ऑलराउंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सध्या फॅमिलीसोबत वेळ घालवताना दिसत आहे. त्याने एक व्हिडीओही शेअर केला असून त्यात तो त्याचा मुलगा अगस्त्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये हार्दीक एका पूलमध्ये दिसत असून त्याने त्याच्या मुलाला उचलून घेतलं आहे. दोघेही अगदी आनंदी दिसत असून मजा करताना दिसत आहेत. हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओला त्याने 'कूलेस्ट वॉटर बेबी' असं कॅप्शनही दिलं आहे.
हार्दिक दुखापतीमुळे आणि मागील काही काळापासून मैदानापासून दूर आहे. टी20 विश्वचषकानंतर तो भारतीय संघात नसल्याचं दिसून येत आहे. तो खेळताना गोलंदाजी करत नसल्याने त्याच्यावर अनेक टीका देखील होत होत्या. तर दुसरीकडे डिसेंबर, 2018 पासून तो लाल चेंडूने क्रिकेट खेळलेला नाही. आता नुकतंच नवा आयपीएल संघ अहमदाबादचं कर्णधारपद त्याला देण्यात आलं आहे. त्यामुळे त्याच्याकडून अनेकांना अपेक्षा आहेत.
गोलंदाजीसाठी हार्दीक तयार?
हार्दिक पांड्या याआधी 2021 साली झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघातून मैदानात उतरला होता. तेव्हापासून त्याच्या गोलंदाजीवर अनेक प्रश्न उठवले जात आहेत. दरम्यान त्याला गोलंदाजीवर काम करायचं असल्याने त्याने स्वत: निवडकर्त्यांना त्याला संघात घेऊ नये असं सांगितलं आहे. क्रिकेट वेबसाइट क्रिकबजच्या रिपोर्टमध्ये हार्दीक म्हणाला, "माझ्यासाठी गोलंदाजी आणि फलंदाजी कायम एक आव्हान राहिलं आहे. मी कायम गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्हीने योगदान देत असतो. मी जेव्हा काही काळ केवळ फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी काही काळ मैदानावर वेळ घालवून अधिक सराव करु इच्छित होतो. मला कायमच नवनवीन आव्हानांशी लढायला आवडतं. मला अंतिम रिझल्ट अधिक महत्त्वाचा असतो. त्यामुळे मी यंदाही कसून सराव करणार आहे.'' हे असं बोलत हार्दिकने गोलंदाजी करणार असल्याचं जणू स्पष्ट केलं आहे.
हे ही वाचा -
- Gujarat Titans Logo: गुजरात टायटन्सचा लोगो रिलीज, हार्दिक पांड्या दिसला अनोख्या अंदाजात
- Hardik Pandya : IPL 2022 मध्ये हार्दिक गोलंदाजी करणार का? स्वत:च दिलं उत्तर
- Road Safety World Series: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लवकरच मैदानात, 'या' चार शहरांमध्ये खेळवले जातील सामने
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha