Road Safety World Series: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लवकरच मैदानात, 'या' चार शहरांमध्ये खेळवले जातील सामने
Road Safety World Series 2022: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आपला जलवा दाखवताना दिसून येतील.
Sachin Tendulkar will be in Action: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा मैदानावर त्याचा जलवा दाखवणार आहे. शिवाय त्याच्यासोबत दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग हेही दिसणार आहेत. दरम्यान ही माहिती एका रिपोर्टमधून समोर आली असून हे दिग्गज खेळाडू रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये फेब्रुवारीत खेळताना दिसून येतील.
समोर आलेल्या माहितीनुसार ही रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात खेळवली जाऊ शकते. हैद्राबाद, विशाखापट्टनम, लखनौ आणि इंदोर या शहरांत हे सामने खेळवले जाणार असल्याचंही सूत्रांच्या माहितीतून समोर येत आहे. दरम्यान उत्तरप्रदेशमध्ये निवडणूका असल्यामुळे लखनौत सामने निवडणूकीच्या रिजल्टनंतर अर्थात 10 मार्चनंतर होण्याची शक्यता आहे. तर इतर शहरांत फेब्रुवारी अखेरपासून सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे.
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या पहिल्या पर्वात भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रीका, श्रीलंका आणि वेस्टइंडीज या संघानी सहभाग घेतला होता. त्या त्या देशातील दिग्गज क्रिकेटपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला असल्याने पुन्हा एकदा सर्व जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. दरम्यान पहिल्या पर्वात सचिन तेंडुलकर कर्णधार असणारी इंडिया लेजेंड्स हा संघ विजयी झाला होता. सचिनसोबत या संघात इरफान पठाण, वीरेंद्र सेहवाग, यूसुफ पठाण आणि युवराज सिंग हे माजी भारतीय दिग्गजही सहभागी झाले होते. इंडिया लेजेंड्सने अंतिम सामन्यात श्रीलंका लेजेंड्सला 14 धावांनी मात देत विजय मिळवला होता. हे सामने रायपुरमध्ये खेळवले गेले होते.
हे देखील वाचा-
- आम्ही मासांहार करुन वाघाप्रमाणे झालो आहे, म्हणून आमच्याकडे वेगवान गोलंदाज अधिक, शोएब अख्तरचा अजब दावा
- Happy Birthday Ruturaj Gaikwad: आयपीएलच्या आठव्या हंगामात ऋतुराजची मोठी कामगिरी, विराट आणि धोनीलाही टाकलं मागे
- IND vs WI, T20 Series: भारतासमोर वेस्ट इंडीजच्या 'या' फलंदाजांचं मोठ आव्हान, इंग्लंडविरुद्ध मालिकेत पाडलाय धावांचा पाऊस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha