एक्स्प्लोर

IPL 2023 : पांड्या ब्रदर्सने रचला इतिहास, आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असे होतेय

IPL 2023 : गुजरात आणि लखनौ यांच्यात रंगतदार लढत सुरु आहे.

IPL 2023 : गुजरात आणि लखनौ यांच्यात रंगतदार लढत सुरु आहे. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या आमने सामने आहेत. गुजरातचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे आहे तर लखनौची धुरा कृणाल पांड्या सांभाळत आहे. दोन भाऊ एकाचवेळी नेृतृव करण्याची आयपीएलमध्ये पहिलीच वेळ आहे. याआधी असा पराक्रम आयपीएलमध्ये कधीच घडला नाही. दोन भाऊ खेळलेले आपण पाहिलेय... पण दोन भाऊ एकमेंकाविरोधात नेतृत्व करत असल्याचे पहिल्यांदाच घडलेय. 

युसूफ पठाण आणि इरफान पठाण, मार्श ब्रदर्स, यान्सेन ब्रदर्स यांना आपण आयपीएलमध्ये खेळताना पहिलेय.. पण आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन भाऊ नेतृत्व करत आहे. सोशल मीडियावर दोघांचेही कौतुक होत आहे. नाणेफेकीवेळी दोन्ही भाऊ भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. सामना सुरु होण्यापूर्वी हार्दिक पांड्या याने आपल्या भावना व्यक्त केल्या. हार्दिक पांड्या म्हणाला की, आमच्या कुटुंबासाठी हा नक्कीच अभिमानाचा आणि भावनिक क्षण असेल.. आमचे वडिलांना आमच्यावर नक्कीच अभिमान वाटेल...  

हसी ब्रदर्सने बीग बॅश लीग स्पर्धेत दोन संघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर आता पहिल्यांदाच असे घडतेय. आयपीएलमध्ये दोन भावांना खेळताना अनेकदा पाहिलेय.. पण नेतृत्व करताना दोन भावांना पहिल्यांदाच झालेय.. सोशल मीडियावर याची चर्चा सुरु आहे. याबाबत अनेक मिम्स अन् ट्वीट व्हायरल होत आहेत.

GT vs LSG, IPL 2023 : लखनौचा कर्णधार कृणाल पांड्याने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. कृणाल पांड्याने हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेय. लखनौचा संघ प्रथम गोलंदाजी करणार आहे. सामन्यानंतर बोलताना हार्दिक पांड्या भावनिक झालेला दिसला. दोन भाऊ आयपीएलमध्ये पहिल्यांदाच नेतृत्व करत आहेत. 

GT vs LSG Head To Head : हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये लखनौ (LSG) आणि गुजरात (GT) या संघांमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये गुजरात संघाचं पारड जड दिसून आलं आहे. गुजरात टायटन्स संघाने तिन्ही सामने जिंकले आहेत, पण लखनौला एकही सामना जिंकता आलेला नाही. आजच्या सामन्यात लखनौ नवा इतिहास रचणार की गुजरात पुन्हा बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Narendra Modi Stadium Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींसाठी पूरक आहे. सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारताना मेहनत घ्यावी लागते. तसेच चौकार षटकाराच्या नादात विकेट जाण्याची शक्यता असते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांचे तेवढेच महत्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
Mirzapur 3 Relaese Date Time OTT Platform : 'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve Mumbai : विधान परिषदेतील आक्षेपार्ह वक्तव्यावरून अंबादास दानवेंची दिलगीरीCM Eknath Shinde On Rahul Gandhi : हिंदू संयमी; योग्यवेळी राहुल गांधींना उत्तर मिळेल - एकनाथ शिंदेUruli Kanchan Palkhi : उरूळी कांचन इथे तुकोबांच्या पालखीचा नगारा अडवलाVishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
Mirzapur 3 Relaese Date Time OTT Platform : 'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
Telly Masala : मिर्झापूर-3  किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम ते  'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
मिर्झापूर-3 किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम ते 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Arbaaz Khan and Sshura Khan : 56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?  मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार? मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Embed widget