Uruli Kanchan Palkhi : उरूळी कांचन इथे तुकोबांच्या पालखीचा नगारा अडवला
Uruli Kanchan Palkhi : उरूळी कांचन इथे तुकोबांच्या पालखीचा नगारा अडवला उरुळी कांचन मध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखीचा नगारा अडवण्यात आलेला आहे.. उरुळी कांचन गावामध्ये दरवर्षीच्या मार्गावरून पालखी घेऊन न गेल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी पालखी थांबवलेली आहे... विश्वस्त आणि उरुळी कांचन चे ग्रामस्थ यांच्यामध्ये वाद झाला दरम्यान... घटनास्थळी पुणे अधीक्षक पंकज देशमुख दाखल झाले असून ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न करीत आहे... पालखी लोणी काळभोरचा मुक्काम आटोपून यवतच्या दिशेने मुक्कामी चालला आहे.. पोलिस अधिक्षक आणि काही स्थआनिक ग्रामस्थांच्या मध्यस्थीनंतर पालखी पुढे काढण्यात आली मात्र ग्रामस्थ अजूनही आंदोलन करतायत
पंढरपूरकडे जााणारी जगद्गुरु संत तुकाराम (Sant Tukaram Maharaj) महराजांची पालखी ऊरळी कांचनमध्ये (Uruli Kanchan) अडवण्यात आलाी आहे. उरुळी कांचन गावामध्ये द गावकऱ्यांनी ही पालखी अडवली असल्याची माहिती समोर येत आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गात छोटासा बदल करण्यात आला. मात्र दरवर्षी ज्या ठिकाणाहून ही पालखी जाते त्या गावातील नागरिकांना हा निर्णय मान्य नाही. त्यामुळेच पालखी अडवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामुळे ग्रामस्थ काही प्रमाणात आक्रमक झाले आहे.
उरुळी कांचनमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखीचा नगारा अडवण्यात आलेला आहे. उरुळी कांचन गावामध्ये दरवर्षीच्या मार्गावरून पालखी घेऊन न गेल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी पालखी थांबवलेली आहे. विश्वस्त आणि उरुळीकांचनचे ग्रामस्थ यांच्यामध्ये वाद झाला दरम्यान घटनास्थळी पुणे अधीक्षक पंकज देशमुख दाखल झाले असून ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न करीत आहे.पालखी लोणी काळभोरचा मुक्काम आटोपून यवतच्या दिशेने मुक्कामी चालला आहे.