Mumbai indians : लागोपाठ 8 पराभवानंतर मुंबई इंडियन्सची तुलना 'या' पाकिस्तानी संघाशी; रोहितला पाहून आठवला बाबर आझम
रविवारी खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 37 व्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने मुंबई इंडियन्सला 36 धावांनी पराभूत केलं. यानंतर आता रोहितला पाहून अनेकांना बाबर आझम आठवत आहे. यामागे एक खास कारण आहे.

Mumbai Indians in IPL 2022 : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेत मुंबई इंडियन्स (MI) संघाची पराभवाची मालिका सुरुच आहे. कर्णधार रोहित शर्माच्या या संघाला सलग 8 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. सलग 8 पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघ आणि कर्णधार रोहित शर्मा अशा साऱ्यांनाच सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. रविवार मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपरजॉयंट्सने (LSG) मुंबईला 36 धावांनी मात दिल्यानंतर पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL) कराची किंग्स संघाशी मुंबईची तुलना केली जात आहे. तर या तुलनेमागे नेमकं कारण काय आहे पाहूया...
पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL) 2022 सीजनमध्ये बाबर आझम कर्णधार असणाऱ्या कराची किंग्स संघाने सुरुवातीचे 8 च्या 8 सामने पराभूत व्हावे लागले. बाबर आझमच्या संघाला थेट 9 व्या सामन्यात पहिला विजय मिळवला. विषेश म्हणजे बाबर आझम हा देखील पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार असून रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार आहे. मुंबई इंडियन्सने सलग आठवा पराभव मिळवल्यानंतर आता फॅन्स रोहितसह संघाला ट्रोल करत आहेत.
लखनौविरुद्ध पराभवानंतर रोहित शर्मा भडकला
मुंबईच्या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) फलंदाजांच्या कामगिरीवर निराशा व्यक्त केली. ''मुंबईची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली होती. परंतु, लखनौच्या संघानं चांगली गोलंदाजी करत मुंबईच्या फलंदाजाला रोखलं. मुंबईच्या फलंदाजांनी भागीदारी करण्याची गरज होती. मुंबईची फलंदाजी चांगली झाली नाही. मधल्या फळीतील फलंदाजांनी संयमी खेळी करण्याची गरज होती. परंतु, काही खेळाडू बेजबाबदारपणानं शॉट्स खेळ खेळले. ज्यामुळं मुंबईचा पराभव झाला,.'' अशा शब्दात रोहित शर्मा संघातील फलंदाजांवर बरसला.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
