(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022 : सलग आठ पराभवानंतर मुंबईचा कोच महेला जयवर्धने निराश, सांगितलं कुठे सुधार करण्याची गरज
MI : मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 37 व्या सामन्यात लखनौच्या संघानं मुंबईला 36 धावांनी पराभूत केलं.
Mumbai Indians in IPL 2022 : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा हेड कोच महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आपल्या संघाच्या खराब प्रदर्शनामुळे नाराज झाला असून यामागे खराब फलंदाजी मुख्य कारण असल्याचं सांगत आहेत. तसंच फलंदाजांना स्वत:च्या कामगिरीचा विचार करुन समीक्षण करण्याचीही गरज असल्याचं तो म्हणाला.
मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 37 व्या सामन्यात लखनौच्या संघानं मुंबईला 36 धावांनी पराभूत केलं. या हंगामातील मुंबईच्या संघाचा सलग आठवा पराभव आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबईच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लखनौच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून मुंबईसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावून 132 धावा करता आल्या. मुंबईच्या या पराभवानंतर को जयवर्धने म्हणाला,"मला फलंदाजांच्या कामगिरीचं समीक्षण करण्याची गरज आहे. संघाने याआधी उत्तम प्रदर्शन केलं आहे. ज्यामुळे त्यांनी पाच वेळा आयपीएलचा चषक उंचावला. आजही लखनौविरुद्ध चांगली गोलंदाजी झाली. राहुलने शतक झळकावूनही लखनौला मोठा स्कोर करता आला नाही. पण फलंदाजांची खास कामगिरी न झाल्याने पराभव पत्करावा लागला. दरम्यान गोलंदाजीतही काही सुधार करण्याची गरज असून फलंदाजीत महत्त्वाचा सुधार गरजेचा आहे.
ईशान किशनची निराशाजनक कामगिरी
जयवर्धने ईशान किशनच्या कामगिरी बद्दल बोलताना म्हणाला, ''महालिलावातील सर्वात महागडा खेळाडू ईशान किशनला हवं तसं खेळण्याचं स्वातंत्र्य देऊनही तो खास कामगिरी करत नाही. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर मात्र ईशान किशनचा फॉर्म चांगला राहिलेला नाही. त्यामुळे त्याला त्याच्या कामगिरीत सुधार करण्याची गरज आहे.''
हे देखील वाचा-