RCB Captain : 'हा' भारतीय होऊ शकतो आरसीबीचा कर्णधार, लवकरच होणार घोषणा
RCB Captain : आगामी आयपीएल 2022 साठी सर्व संघ तयार झाले आहेत. पण रॉयल चँलेजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार अजूनही जाहीर झालेला नाही.
RCB Captain : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चा मेगा लिलाव बंगळुरूमध्ये काही दिवसांपूर्वी पार पडला अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. आता 26 मार्चपासून सामनेही सुरु होणार आहेत. भारतात यंदा ही लीग पार पडणार असून 10 संघ एकूण 70 सामने खेळणार आहेत. यातील 9 संघाचे कर्णधार समोर आले आहेत. पण आरसीबी संघाचा कर्णधार अजूनही जाहीर झालेला नाही.
दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार आरसीबीचा पुढील कर्णधार दिनेश कार्तिक असून शकतो. दिनेशने कोलकाता नाइट रायडर्स संघाची कमान याआधी सांभाळली आहे. आरसीबीने दिनेश कार्तिकला आयपीएल 2022 मध्ये तब्बल 5.50 कोटी देऊन विकत घेतले आहे. एबी डिव्हीलीयर्सनंतर यष्टीरक्षक म्हणून दिनेश संघात आला असून शिवाय कर्णधारपदाचा त्याला अनुभव असल्याने त्याच्याकडे ही जबाबदारी दिली जाऊ शकते. तसंच 2015 मध्ये दिनेश आरसीबी संघातून आयपीएल खेळला होता. दरम्यान 2021 वर्षात मात्र दिनेशने आयपीएलच्या 17 सामन्यांत 223 रनत केले आहेत. 40 हा त्याचा सर्वोच्च स्कोर होता.
'हा' देखील पर्याय
आगामी आयपीएलमध्ये आरसीबीचा कर्णधार म्हणून दिनेशसह आणखी एक नाव समोर येत आहे. ते म्हणजे यंदा सलामीवीर म्हणून आरसीबीने संघात घेतलेला फाफ डुप्लेसीस. फाफने दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी पेलली आहे. त्यामुळे त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
हे देखील वाचा-
- IPL 2022 : आयपीएलचे 70 सामने मुंबई-पुण्यात, MI-CSK वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, पाहा कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये?
- IPL 2022 : मुंबईत 26 मार्चपासून रंगणार आयपीएलचे सामने, एकनाथ शिंदेंसह आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा, आयपीएलसाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन
- MS Dhoni: 'स्वप्न सत्यात उतरलं' महेंद्रसिंह धोनीला भेटल्यानंतर पाकिस्तानच्या युवा गोलंदाजाची मोठी प्रतिक्रिया
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha