एक्स्प्लोर

IPL 2022 : मुंबईत 26 मार्चपासून रंगणार आयपीएलचे सामने, एकनाथ शिंदेंसह आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा, आयपीएलसाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन

IPL 2022: आयपीएल 2022 चं बिगुल नुकतचं वाजलं असून 26 मार्चपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. यंदा आयपीएलमध्ये 70 सामने खेळवले जाणार आहेत.

IPL 2022: आगामी आयपीएलचं बिगुल अखेर वाजलं असून याच महिन्यांत सामन्यांना सुरुवात होणार आहे. 26, मार्च, 2022 रोजी मुंबईच्या वानखेडे मैदानात चेन्नई सुपरकिंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने आयपीएलची सुरुवात होणार असून मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे आयपीएलचे सामने होणार आहेत. 70 सामने यंदाच्या स्पर्धेत खेळवले जाणार असून त्यासाठी पोलिस, महानगरपालिका यांच्यासह मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय यांनी समन्वयाने काम करुन आयपीएल 2022 स्पर्धा यशस्वीपणे पार पाडावी, असं आवाहन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

सह्याद्री अतिथीगृहात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत आयपीएल 2022 सामन्यांच्या वेळी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, पोलीस आयुक्त संजय पाण्डेय, नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर, ठाणे महापालिका आयुक्त विपीनकुमार शर्मा, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या टी-२० गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर, कार्यकारी सचिव सी.एस. नाईक, आयपीएलचे प्रमुख हेमांग अमिन यांचेसह वरिष्ठ पोलीस, महापालिका अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाबाबत काळजी अनिवार्य

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सामने मुंबई होणार असले तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियम आणि सुरक्षा या दृष्टीने विचार करुनच ही स्पर्धा घ्यावयाची आहे. मागील दोन वर्षे कोविडच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलसारख्या स्पर्धा मुंबईत होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना हे सामने पाहता यावेत त्याचबरोबर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुण्यातील अर्थव्यवस्थेला या स्पर्धेमुळे गती मिळावी या उद्देशाने बीसीसीआयशी चर्चा करुन आयपीएल 2022 चे आयोजन करण्यात आले आहे, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथील पोलीस, महापालिका यांनी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचना देतानाच सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करा, त्यासाठी एसओपी तयार करण्याचे निर्देश आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने 25 टक्के प्रेक्षकांची उपस्थिती मर्यादा ठेवण्यात आली असून लसींचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.  

आयपीएल 2022

आयपीएल 2022 हा 15 वा हंगाम भारतामध्ये कोरोना नियमांचे पालन करुन होणार आहे. लीग स्पर्धेत 70 सामने होणार आहेत. हे सर्व सामने मुंबई आणि पुणे येथील चार ठिकाणी होणार आहेत. मुंबईतील वानखेडे मैदानावर 20, ब्रेबॉन मैदानावर 15, डीवाय पाटील मैदानावर 20 आणि पुण्यातील मैदानावर 15 सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघाला समान संधी मिळेल यासाठी बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, प्रत्येक संघाचे चार चार सामने वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडिअम या मैदानावर होणार आहे. तर प्रत्येक संघाचे तीन तीन सामने ब्रेबॉन आणि पुणे मैदानावर होणार आहेत. प्रत्येक संघ लीग स्टेजमध्ये 14 सामने खेळणार आहे. त्यामध्ये पाच संघाविरोधात प्रत्येक संघाला दोन तर चार संघाविरोधात एक एक सामना खेळावा लागणार आहे.

पाहा ग्रुप - 

ग्रुप अ

1

MI(5)

2

CSK(4)

3

KKR(2)

4

SRH(1)

5

RR(1)

6

RCB

7

DC

8

PBKS

9

LSG

10

GT

प्रत्येक संघ आपल्या ग्रुपमधील इतर चार संघाविरोधात प्रत्येकी दोन सामने खेळेल. तसेच दुसऱ्या ग्रुपमधील एका संघाबरोबर दोन सामने खेळणार आहे.  तर दुसऱ्या ग्रुपमधील इतर संघाबरोबर प्रत्येकी एक एक सामना खेळावा लागेल. उदा. ग्रुप अ मध्ये मुंबई  कोलकाता, राजस्थान, दिल्ली आणि लखनौ या संघाबरोबर प्रत्येकी दोन सामने खेळेल. तर ब ग्रुपमधील चेन्नई संघाबरोबर दोन सामने खेळणार आहे.  ब ग्रुपमधील इतर संघाविरोधात मुंबई प्रत्येकी एक सामना खेळणार आहे. याचप्रमाणे ग्रुप बी मध्ये आरसीबीचा संघ चेन्नई, हैदराबाद, पंजाब आणि गुजरात या संघाबरोबर प्रत्येकी दोन सामने खेळेल. तर ग्रुप अ मधील राजस्थान संघाविरोधात दोन सामने खेळेल अन् इतर संघाविरोधात प्रत्येकी एक एक सामना खेळणार आहे.

कोणत्या संघाचे कुणाबरोबर किती सामने?
संघ MI KKR RR DC LSG CSK SRH RCB PBKS GT एकूण
↓प्रतिस्पर्धी| सत्र- > 2022 2022 2022 2022 2022 2022 2022 2022 2022 2022  
MI 0 2 2 2 2 2 1 1 1 1 14
KKR 2 0 2 2 2 1 2 1 1 1 14
RR 2 2 0 2 2 1 1 2 1 1 14
DC 2 2 2 0 2 1 1 1 2 1 14
LSG 2 2 2 2 0 1 1 1 1 2 14
CSK 2 1 1 1 1 0 2 2 2 2 14
SRH 1 2 1 1 1 2 0 2 2 2 14
RCB 1 1 2 1 1 2 2 0 2 2 14
PBKS 1 1 1 2 1 2 2 2 0 2 14
GT 1 1 1 1 2 2 2 2 2 0 14
एकूण सामने / Team 14 14 14 14 14 14 14 14 14 14  

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget