CSK vs LSG Match Preview : चेन्नई विरुद्ध लखनौ लढत? पाहा हेड टू हेड आकडेवारीमध्ये कोण वरचढ? पाहा...
IPL 2023 CSK vs LSG Match Preview : इंडियन प्रीमियर लीगच्या 45 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Gaints) दोन संघ आमने-सामने येणार आहेत.
IPL 2023 CSK vs LSG Match Prediction : इंडियन प्रीमियर लीगच्या 45 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Gaints) दोन संघ आमने-सामने येणार आहेत. लखनौच्या इकाना स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. चेन्नई आणि लखनौ दोन्ही संघांना मागील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. मागील सामन्यात पंजाबनं चेन्नईला चार विकेटने पराभव केला. तर, लखनौचा बंगळुरुने 18 धावांनी पराभव केला.
IPL 2023 CSK vs LSG : चेन्नई आणि लखनौ आमने-सामने
लखनौ आणि चेन्नई दोन्ही संघ यंदाच्या आयपीएल हंगामात चांगली कामगिरी करताना दिसत आहे. दोन्ही संघ टॉप 4 मध्ये स्थान बवनून आहेत. आयपीएल 2023 मध्ये चेन्नईने आतापर्यंत नऊ पैकी पाच सामने जिंकले असून चार सामने गमावले आहेत. तर दुसरीकडे लखनौ संघानेही नऊ पैकी पाच सामने जिंकले असून चार सामन्यांत पराभव स्वीकारला आहे.
Setting foot in the land of Nawabs for the Clash of the Supers! 🔥#LSGvCSK #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/1OxusoBotm
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 3, 2023
CSK vs LSG Head to Head : हेड टू हेड आकडेवारी पाहा
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Gaints) या दोन संघात आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. या दोन्ही संघांची स्थिती समान आहे. चेन्नई आणि लखनौ दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.
IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Gaints) यांच्यात आज, 03 मे रोजी लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना लखनौमधील इकाना स्टेडिअमवर (Ekana Sport City Stadium) दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. त्याआधी दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :