ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 06 November 2024
सकाळी ७ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाई्न्स 7 AM टॉप हेडलाईन्स 7 Am 06 नोव्हेंबर 2024
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प आघाडीवर, इंडियाना, केंटुकी, वेस्ट व्हर्जिनिआ राज्यात ट्रम्प यांचा विजय, तर व्हरमाँटमध्ये कमला हॅरिस यांचा विजय, विजयासाठी २७० इलेक्टोरल मतांची आवश्यकता
काँग्रेस अध्यक्ष खरगे आणि राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, राहुल गांधी दीक्षाभूमीचं घेणार दर्शन, नागपुरात संविधान सभा, संध्याकाळी मुंबईत मविआची प्रचारसभा
महाविकास आघाडीचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार, बीकेसीत महाराष्ट्र स्वाभिमान सभेत राहुल गांधी, पवार, ठाकरेंच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं प्रकाशन
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार, बारामतीत अजित पवार, मुंबईत प्रदेशाध्यक्ष तटकरे तर गोंदियात प्रफुल पटेल करणार जाहीरनामा सादर
राज्यात २५ हजार महिलांची पोलीस भरती, लाडक्या बहिणींना प्रतिमहिना २१०० रुपये, २५ लाख रोजगार निर्मिती तर शेतकरी सन्मान निधी १५ हजारांवर...कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांकडून १० मोठ्या घोषणा
मोहम्मद पैगंबर बिल विधिमंडळात मंजूर करू, प्रकाश आंबेडकरांकडून वंचितच्या जाहीरनाम्यात घोषणा, महिलांना प्रतिमहिना साडे तीन हजारांचं वेतन देण्याचं आश्वासन
देवेंद्र फडणवीसांचा आज पश्चिम महाराष्ट्र दौरा, सांगली जिल्ह्यात जत, सातार जिल्ह्यात कराडमध्ये, तर पुणे जिल्ह्यात चिंचवडमध्ये फडणवीसांच्या प्रचारसभा
राज ठाकरेंचा आज लातूर, सोलापूर आणि अमरावतीमध्ये प्रचारसभांचा धडाका, मनसे उमेदवार संतोष नागरगोजे, दिलीप धोत्रे आणि पप्पू पाटलांसाठी सभा
मुख्यमंत्री शिंदेंची आज दुपारी १ वाजता टीप टॉप प्लाझा इथे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बैठक, ठाण्यातल्या चार मतदारसंघांच्या रणनीतीवर चर्चा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा महाराष्ट्र दौरा, वाशिम, अमरावती, अकोला जिल्ह्यात सभा
नवे पोलीस महासंचालक संजय कुमार वर्मांच्या नियुक्तीसंदर्भात 'तात्पुरत्या' शब्दावर काँग्रेसचा आक्षेप, निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार
कॅनडामध्ये ब्रॅम्पटन इथे हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक, आंदोलनात सहभागी झालेला पोलीस अधिकारी हरिंदर सोही निलंबित
कोविड काळात घरात बसून हिशोब काय मागता, एकनाथ शिंदेंचा सवाल... तर घरात बसून लोकांची घरं सांभाळली, उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर..