CSK vs GT Weather Report : IPL फिवरच्या रंगाचा बेरंग करणार पाऊस? अहमदाबादचं वातावरण कसं असेल?
GT vs CSK Weather Report : आयपीएल 2023 चा पहिला सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. आदल्या दिवशी येथे पावसामुळे चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्या सराव सत्रात व्यत्यय आला होता.
Ahmedabad Weather Update : आजपासून इंडियन प्रीमियर लीगला (Indian Premier League 2023) सुरुवात होणार असून सर्वत्र आयपीएल फिवर (IPL Fever) पाहायला मिळत आहे. आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स पहिला सामना पाहायला मिळणार आहे. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. मात्र, पाऊस आयपीएल फिवरचा रंग बेरंग करणार असल्याचं चित्र आहे.
अहमदाबादमध्ये गुरुवारी पाऊस पडला
अहमदाबादमध्ये गुरुवारी येथे पाऊस पडला. अहमदाबादमधील वातावरणामुळे यंदाच्या मोसमातील पहिल्याच सामन्यावर पावसाचं सावट दिसून येत आहे. अहमदाबादमध्ये गुरुवारी पडलेल्या पावसामुळे चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स या संघांच्या सराव सत्रामध्येही व्यत्यय आला होता.
पाहा व्हिडीओ : चेन्नई आणि गुजरातच्या सराव सत्रामध्ये व्यत्यय
Who are you when it rains, #TitansFAM? ⚡️🥲☔️⛈️#AavaDe | #TATAIPL2023 pic.twitter.com/X8AXZvaKV0
— Gujarat Titans (@gujarat_titans) March 30, 2023
दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटणार आहे. ताज्या अपडेटनुसार, आज अहमदाबादचे हवामान स्वच्छ राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, येथे पावसाची शक्यता नाही. म्हणजेच क्रिकेट चाहत्यांना कोणताही अडथळ्याविना आजच्या सामन्याचा आनंद घेता येणार आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज अहमदाबादमध्ये कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत तर किमान तापमान 22 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान म्हणजे संध्याकाळी तापमान 29 अंशांच्या आसपास असू शकतं. चेन्नई आणि गुजरात संघातील सामन्यादरम्यान, 13 ते 18 किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याची अपेक्षा असून 50 ते 55 टक्के आर्द्रता देखील असण्याची शक्यता आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार पहिला सामना
आजपासून IPL 2023 ला सुरुवात होणार आहे. सुमारे पाच वर्षानंतर आयपीएलला उद्घाटन सोहळ्यासह सुरुवात होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या ठिकाणी पहिला सामना रंगेल. सामना सुरू होण्याच्या दीड तास आधी उद्घाटन सोहळा पार पडेल आहे. आयपीएलचा उद्घाटन सोहळा 6 वाजता सुरु होईल आणि सुमारे 45 मिनिटे चालेल. यानंतर 7 वाजता नाणेफेक होईल आणि 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. आयपीएल 2023 मधील पहिला सामना चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सचा आणि गतविजेत्या गुजरात टायटन्समध्ये रंगणार आहे.