एक्स्प्लोर

IPL 2024 SRH VS RR  Qualifier 2: हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर तीन गोष्टींवर बोट ठेवलं...; संजू सॅमसमने कोणावर खापर फोडलं?

IPL 2024 SRH VS RR  Qualifier 2: या विजयासह हैदराबादने आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. हैदराबादचा आणि कोलकाताचा अंतिम सामना 26 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. 

IPL 2024 SRH VS RR  Qualifier 2: सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात झालेल्या क्वालिफायर 2 च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 36 धावांनी पराभव केला. या विजयासह हैदराबादने आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. हैदराबादचा आणि कोलकाताचा अंतिम सामना 26 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. 

चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादने प्रथम खेळताना 175 धावा केल्या होत्या. हेनरिक क्लासेनने अर्धशतक केले, तर राहुल त्रिपाठीने 15 चेंडूत 37 धावांची खेळी करत हैदराबादने सन्मानजनक धावसंख्या गाठली. राजस्थान संघ जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा यशस्वी जैस्वाल व्यतिरिक्त संघातील इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. जैस्वालने 21 चेंडूत 42 धावा केल्या आणि या खेळीत त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. विशेषत: शाहबाज अहमदने मधल्या षटकांमध्ये 3 महत्त्वाचे बळी घेत सामना फिरवला.

सामन्यानंतर संजू सॅमसन काय म्हणाला?

राजस्थान या पराभवानंतर कर्णधार संजू सॅमसन म्हणाला की, हा एक मोठा सामना होता. पहिल्या डावात आम्ही ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्याचा मला अभिमान आहे. पण मधल्या षटकांमध्ये त्यांच्या फिरकीच्या विरोधात आमच्याकडे पर्याय संपले, जिथे आम्ही खेळ गमावला. त्यांच्या डाव्या हाताच्या फिरकीच्या विरोधात, आम्ही थोडा अधिक रिव्हर्स-स्वीप मारण्याचा प्रयत्न करू शकलो असतो किंवा चेंडू थांबत असताना क्रिझचा थोडा अधिक वापर करू शकलो असतो. मात्र हैदराबादच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली.

दुसऱ्या डावात खेळपट्टी बदलली-

या सामन्यादरम्यान दव पडले नाही, त्यामुळे सनरायझर्सच्या गोलंदाजांचे आव्हान सोपे झाले. दव कधी पडेल आणि कधी पडणार नाही हे सांगणे खूप अवघड आहे, असे सॅमसनने सांगितले. दुसऱ्या डावात खेळपट्टी काही प्रमाणात बदलल्याचे दिसून आले, चेंडू चांगला प्रकारे वळत होता. आमच्या उजव्या हाताच्या फलंदाजांविरुद्ध हैदराबादने फिरकीचा चांगला वापर केला.

अभिषेक आणि शाहबाजची चमकदार कामगिरी-

सनरायझर्स हैदराबादकडून शाहबाज अहमदने 23 धावांत तीन तर अभिषेक शर्माने 24 धावांत दोन बळी घेतले. तत्पूर्वी, हेन्रिक क्लासेनच्या (34 चेंडूंत चार षटकारांसह 50 धावा) अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्सने नऊ गडी गमावून 175 धावा केल्या. ट्रेंड बोल्टने पॉवरप्लेमध्ये तीन विकेट घेतल्या. मात्र राहुल त्रिपाठीने 15 चेंडूत 37 धावा करत संघावर दडपण येऊ दिले नाही.

संबंधित बातम्या:

Team India Head Coach: स्टीफन फ्लेमिंगला टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हायचे आहे? चेन्नईच्या CEO ने केला धक्कादायक खुलासा!

Hardik Pandya and Natasa Stankovic: हार्दिक पांड्या अन् नताशाचा घटस्फोट होणार?; 4 घडामोडींनी वेधलं लक्ष, सोशल मीडियावर चर्चांना उधाण!

Virat Kohli: नरेंद्र मोदी मैदानावर विराट कोहलीचे 6 महिन्यात दोनदा स्वप्न भंगले; 700 धावांचा आकडा ठरला 'Unlucky'!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget