IPL 2024 Catch Of The Season: चित्यासारखी धाव, बिबट्यासारखी झेप; यंदा रमणदीप 'Catch Of The Season'चा ठरला मानकरी, पाहा Video
IPL 2024 Catch Of The Season: इमर्जिंग प्लेअरचा पुरस्कार हैदराबादच्या नितीशकुमार रेड्डीला देण्यात आला. सर्वाधित षटकार मारण्याचा पुरस्कार हैदराबादच्या अभिषेक शर्माला दिला.
IPL 2024 Catch Of The Season: कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आयपीएल 2024 चा (IPL 2024) चॅम्पियन संघ ठरला आहे. सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 8 विकेट्सने पराभव करत मोठा विजय नोंदवला. हैदराबादने केकेआरला विजयासाठी अवघ्या 114 धावांचे सोपे आव्हान दिले होते. कोलकाताने अवघ्या षटकात हे आव्हान सहज गाठले आणि तिसऱ्यांदा जेतेपद पटकावले.
आयपीएल 2024 मधील ऑरेंज कॅपचा पुरस्कार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विराट कोहलीला (Virat Kohli) मिळाला. तर पंजाब किंग्सच्या हर्षल पटेल पर्पल कॅपचा मानकरी ठरला. इमर्जिंग प्लेअरचा पुरस्कार हैदराबादच्या नितीशकुमार रेड्डीला देण्यात आला. तसेच 2024 च्या हंगामात सर्वाधित षटकार मारण्याचा पुरस्कार हैदराबादच्या अभिषेक शर्माला दिला. कोलकाताचा सुनील नरेन आयपीएल 2024 मधील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ठरला.
आयपीएल 2024 मधील सर्वोत्तम झेल घेण्याचा पुरस्कार कोणाला?
आयपीएल 2024 मधील 'कॅच ऑफ द सिझन'चा पुरस्कार कोलकाताच्या रमणदीप सिंगला देण्यात आला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध त्याने बिबट्यासारखी झेप घेत अप्रतिम झेल टिपला होता. हाच झेल यंदाच्या हंगामातील उत्कृष्ट ठरला आहे. (KKR Player Ramandeep Singh Win Catch of the season Award )
Catch of the season - never doubted it! 😍pic.twitter.com/o76mu0UXpO
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 26, 2024
The catch of the season. A catch for the history books 🤌 pic.twitter.com/U6Dwt6tBQq
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 26, 2024
व्यंकटेश अय्यरची अर्धशतकी खेळी, आंद्रे रसेलच्या तीन विकेट्स
सनरायजर्स हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यानंतर आंद्रे रसेलने 3 विकेट्स पटकावल्या. विशेष म्हणजे पॅट कमिंसलाही त्यानेच तंबूत पाठवले. कमिंस शिवाय अब्दुल समद आणि अॅडम मार्करमलाही रसेलने माघारी धाडले. त्यामुळे हैदराबादला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. त्यानंतर हैदराबादने दिलेल्या 114 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने अर्धशतकी खेळी केली. त्याने 26 चेंडूमध्ये 52 धावांची खेळी केली. व्यंकटेश अय्यर शिवाय, रहमदुल्लाह गुरबाजनेही 39 धावा करत महत्वपूर्ण भूमिका बजावली.
हैदराबादचे 114 धावांचे आव्हान केकेआर सहज गाठले
चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, सनरायजर्सच्या फलंदाजांना नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. हैदराबादचा संघ सर्वबाद 113 धावा करु शकला. केकेआरने हैदराबादचे 114 धावांचे आव्हान केवळ 10.3 षटकांमध्ये गाठले. हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिंसने 24 धावा केल्या. कमिंस शिवाय, मार्करम 20 केल्या. मात्र, इतर एकाही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. प्रत्येक सामन्यात मोठी धावसंख्या उभारणाऱ्या हैदराबादच्या संघाने फायनलमध्ये मात्र सुमार कामगिरी केली.