एक्स्प्लोर
नेहराचा नोकिया 1100ला बाय-बाय, खरेदी केला महागडा फोन

नवी दिल्ली: भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज आणि आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करणारा गोलंदाज अशिष नेहराने नोकिया 1100 ला बाय-बाय केले असून, नवा आयफोन खरेदी केल्याचे सांगितले. चेन्नईमध्ये टीएनपीएल (तामिळनाडू प्रीमिअर लीग) मधील चेपॉक सुपर गिलीजच्या लाँचिंगवेळी त्याने ही माहिती दिली. एका प्रश्नाला उत्तर देताना विनोदी शैलीत तो म्हणाला की, आपण आता नोकिया 1100 फोन वापरणे सोडले आहे. आपण आता नवीन आयफोन खरेदी केला असून, यावरील फिचर्सचा वापर शिकत आहोत. सध्या आपण या मोबाईलवरून व्हॉटसअॅप वापरत असल्याचेही तो म्हणाला. यावेळी त्याने आपल्या गुडघ्याच्या दुखापतीपासून ठिक होत असल्याचे सांगून, सध्या बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये धावण्यासोबतच इतर गोष्टींचे ट्रेनिंग घेत असल्याची माहिती दिली. आयपीएलच्या 9 व्या सीझनमध्ये भुवनेश्वर कुमारसारख्या नवोदित खेळाडूकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याने आत्मविश्वास वाढल्याचे स्पष्ट केले. आशिष नेहराला गेल्या आयपीलच्या 9 पर्वात गुडघ्याला दुखापत झाल्याने क्रिकेट क्षेत्रापासून दूर रहावे लागले. नेहरा नुकत्याच झालेल्या टी 20 च्या विश्व चषकाच्या भारतीय संघात समावेश होता. त्याने 23 टी-20 सामन्यात 31 खेळाडू बाद केले होते. तर एकदिवसीय सामन्यात 120 सामन्यात 157 खेळाडू बाद केले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण























