एक्स्प्लोर

आयपीएल 2018 : आठ संघ, 169 खेळाडू, संपूर्ण यादी

पहिला दिवस बेन स्टोक्सने, तर दुसरा दिवस भारताचा युवा गोलंदाज जयदेव उनाडकटने गाजवला. दोघे या आयपीएलमधील सर्वाधिक महागडे खेळाडू ठरले.

बंगळुरु : आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठीचा लिलाव पार पडला आहे. दोन दिवस चाललेल्या या लिलावात खेळाडूंवर पैशांचा अक्षरशः पाऊस पाडण्यात आला. पहिला दिवस बेन स्टोक्सने, तर दुसरा दिवस भारताचा युवा गोलंदाज जयदेव उनाडकटने गाजवला. दोघे या आयपीएलमधील सर्वाधिक महागडे खेळाडू ठरले. राजस्थान रॉयल्सने बेन स्टोक्सला 12.5 कोटींमध्ये, तर जयदेव उनाडकटला 11.5 कोटींमध्ये खरेदी केली. जयदेव हा एवढी किंमत मिळालेला पहिलाच भारतीय खेळाडू आहे. बेन स्टोक्सवर गेल्या वर्षीच्या आयपीएल लिलावातही सर्वाधिक बोली लागली होती. याशिवाय सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल आणि मनीष पांडे सर्वाधिक महागडे भारतीय खेळाडू ठरले. दोघांवरही प्रत्येकी 11 कोटींची बोली लावण्यात आली. मनीष पांडेला सनरायझर्स हैदराबादने, तर राहुलला किंग्ज इलेव्हन पंजाबने खरेदी केलं. गौतम गंभीरचं दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये पुनरागमन कोलकाता नाईट रायडर्सला दोन वेळा आयपीएल चॅम्पियन बनवणाऱ्या गौतम गंभीरचं दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये पुनरागमन झालं आहे. दिल्लीने त्याला 2.8 कोटींमध्ये खरेदी केलं. अंडर-19 संघाचा कर्णधार पृथ्वी शॉसाठी दिल्लीने 1 कोटी 20 लाख रुपये खर्च केले. गेल्या आयपीएल मोसमात दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी खेळलेल्या कागिसो रबाडासाठी चेन्नई सुपर किंग्जने 4.2 कोटींची बोली लावली, मात्र दिल्लीने राईट टू मॅचचा वापर करत रबाडाला खरेदी केलं. दिल्लीचा गेल्या वेळचा खेळाडू यावेळी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसेल. राजस्थानने त्याच्यासाठी 8 कोटी रुपये खर्च केले. तर दिल्लीने मोहम्मद शमीसाठीही राईट टू मॅचचा वापर केला. शमीला हैदराबादने 3 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. अश्विन पंजाबच्या ताफ्यात दोन कोटींची बेस प्राईस असलेल्या ग्लेन मॅक्सवेलला दिल्लीने 9 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं. तर कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला 9.4 कोटींमध्ये आपल्या ताफ्यात सहभागी केलं. दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबने रविचंद्रन अश्विनवर 7.6 कोटींची बोली लावत त्याला खरेदी केली. अश्विनसाठी राजस्थान रॉयल्स आणि पंजाबमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. पंजाबने ड्वेन ब्रॅव्होला खरेदी केलं होतं, मात्र चेन्नई सुपर किंग्जने राईट टू मॅचचा वापर करत पुन्हा ब्रॅव्होला खरेदी केलं. तर शिखर धवन (हैदराबाद), किरॉन पोलार्ड (मुंबई), अंजिक्य रहाणे (राजस्थान रॉयल्स) आणि फाफ डु प्लेसिस (चेन्नई) यांचा त्यांच्या जुन्याच संघांमध्ये समावेश करण्यात आला आहे. चेन्नईने हरभजन सिंहला 2 कोटींमध्ये खरेदी केलं. बांगलादेशचा ऑलराऊडंर खेळाडू शकीब अल हसनसाठी हैदराबादने 2 कोटींची बोली लावली. युवराजचं पंजाबमध्ये पुनरागमन आयपीएलची सुरुवात पंजाबमधून करणाऱ्या युवराज सिंहचं होम टीममध्ये पुनरागमन झालं आहे. त्याच्यासाठी पंजाबने 2 कोटींची बोली लावली. केदार जाधवसाठी चेन्नईने 7.8 कोटी रुपये खर्च केले.

सर्व संघ आणि खेळाडूंची यादी

चेन्नई सुपर किंग्ज (एकूण खेळाडू - 25)
  1. महेंद्र सिंह धोनी
  2. सुरेश रैना
  3. रवींद्र जाडेजा
  4. फफ डू प्लेसिस
  5. हरभजन सिंह
  6. ड्वेन ब्रॅव्हो
  7. शेन वॉट्सन
  8. केदार जाधव
  9. अंबाती रायडू
  10. इम्रान ताहीर
  11. कर्ण शर्मा
  12. शार्दूल ठाकूर
  13. नारायण जगदिसान
  14. मिशेल सँटनर
  15. दीपक चहल
  16. केएम असिफ
  17. लुंगी एनगिडी
  18. कनिष्क सेठ
  19. ध्रुव शोरे
  20. मुरली विजय
  21. सॅम बिलिंग्स
  22. मार्क वूड
  23. क्षितिज शर्मा
  24. मोनू कुमार
  25. चैतन्य बिष्णोई
दिल्ली डेअरडेव्हिल्स (एकूण खेळाडू-25)
  1. ऋषभ पंत
  2. ख्रिस मॉरिस
  3. श्रेय अय्यर
  4. ग्लेन मॅक्सवेल
  5. गौतम गंभीर
  6. जेसन रॉय
  7. कॉलिन मुन्रो
  8. मोहम्मद शमी
  9. कॅगिसो रबाडा
  10. अमित मिश्रा
  11. पृथ्वी शॉ
  12. राहुल तेवाटिया
  13. विजय शंकर
  14. हर्षल पटेल
  15. आवेश खान
  16. शाहबाज नदीम
  17. डॅनियल ख्रिश्चियन
  18. जयंत यादव
  19. गुरकिरत मान सिंह
  20. ट्रेंट बोल्ट
  21. मनजोत कलरा
  22. अभिषेक शर्मा
  23. संदीप लमिछने
  24. नमन ओझा
  25. सायन घोष
किंग्ज इलेव्हन पंजाब (एकूण खेळाडू - 21)
  1. अक्षर पटेल
  2. रविचंद्रन अश्विन
  3. युवराज सिंह
  4. करुण नायर
  5. लोकेश राहुल
  6. डेव्हिड मिलर
  7. अॅरॉन फिंच
  8. मार्कस स्टॉईनिस
  9. मयंक अग्रवाल
  10. अंकित राजपूत
  11. मनोज तिवारी
  12. मोहित शर्मा
  13. मुजीब झद्रान
  14. बरिंदन श्रण
  15. अँड्र्यू टाय
  16. अक्षदीप नाथ
  17. बेन ड्वार्शिअस
  18. प्रदीप साहू
  19. मयंक डागर
  20. ख्रिस गेल
  21. मंझूर दार
कोलकाता नाईट रायडर्स (एकूण खेळाडू - 19)
  1. सुनील नारायण
  2. आंद्रे रसल
  3. मिचेल स्टार्क
  4. ख्रिस लीन
  5. दिनेश कार्तिक
  6. रॉबिन उथप्पा
  7. पियुष चावला
  8. कुलदीप यादव
  9. शुबमान गिल
  10. इशांक जग्गी
  11. कमलेश नागरकोटी
  12. नितीश राणा
  13. विनय कुमार
  14. अपूर्व वानखेडे
  15. रिंकू सिंह
  16. शिवम मावी
  17. कॅमरॉन डेलपोर्ट
  18. मिचेल जॉन्सन
  19. जेव्हन सिअरलेस
मुंबई इंडियन्स (एकूण खेळाडू -25)
  1. रोहित शर्मा
  2. हार्दिक पंड्या
  3. जसप्रीत बुमरा
  4. किरॉन पोलार्ड
  5. मुस्ताफिजुर रहमान
  6. पॅट कमिन्स
  7. सूर्यकुमार यादव
  8. कृणल पंड्या
  9. इशान किशन
  10. राहुल चहर
  11. एव्हिन लेविस
  12. सौरव तिवारी
  13. बेन कटिंग
  14. प्रदीप संगवान
  15. जेपी ड्युमिनी
  16. जेसन बहरनडॉर्फ
  17. तेजिंदर सिंह
  18. शरद लुंबा
  19. सिद्धेश लाड
  20. आदित्य तरे
  21. मयंक मार्कंडे
  22. अकिला धनंजया
  23. अनुकुल रॉय
  24. मोहसिन खान
  25. एमडी निधीश
राजस्थान रॉयल्स (एकूण खेळाडू -23)
  1. स्टीव्ह स्मिथ
  2. बेन स्टोक्स
  3. अजिंक्य रहाणे
  4. स्टुअर्ट बिन्नी
  5. संजू सॅमसन
  6. जॉस बटलर
  7. राहुल त्रिपाठी
  8. डीअर्सी शॉर्ट
  9. जोफ्रा आर्चर
  10. क्रिष्णप्पा गौतम
  11. धवल कुलकर्णी
  12. जयदेव उनाडकट
  13. अंकित शर्मा
  14. अनुरित सिंह
  15. झहीर खान
  16. श्रेयस गोपाल
  17. सुधासेन मिधुन
  18. प्रशांत चोप्रा
  19. बेन लाफलिन
  20. महिपाल लोमरोर
  21. जतिन सक्सेना
  22. आर्यमान बिर्ला
  23. दुष्मंथा चमिरा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (एकूण खेळाडू - 24)
  1. विराट कोहली
  2. एबी डिव्हिलियर्स
  3. सर्फराज खान
  4. ब्रँडन मॅक्क्युलम
  5. ख्रिस वोक्स
  6. कॉलिन डी ग्रँडहोम
  7. मोईन अली
  8. क्विंटन डी कॉक
  9. उमेश यादव
  10. यजुवेंद्र चहल
  11. मनन वोहरा
  12. कुलवंत खेजरोलिया
  13. अनिकेत चौधरी
  14. नवदीप सैनी
  15. मुरुगन अश्विन
  16. मनदीप सिंह
  17. वॉशिंग्टन सुंदर
  18. पवन नेगी
  19. मोहम्मद सिराज
  20. नाथन काल्टर नाईल
  21. अनिरुद्ध जोशी
  22. पार्थिव पटेल
  23. टीम साऊथी
  24. पवन देशपांडे
सनरायझर्स हैदराबाद (एकूण खेळाडू - 25)
  1. डेव्हिड वॉर्नर
  2. भुवनेश्वर कुमार
  3. शिखर धवन
  4. केन विल्यम्सन
  5. शकीब अल हसन
  6. मनीष पांडे
  7. कार्लोस ब्रेथवेट
  8. युसूफ पठाण
  9. रिद्धीमान साहा
  10. रशीद खान
  11. रिकी भुई
  12. दीपक हुडा
  13. सिद्धार्थ कौल
  14. टी. नटराजन
  15. बसिल थम्पी
  16. खलील अहमद
  17. मोहम्मद नबी
  18. संदीप शर्मा
  19. सचिन बेबी
  20. ख्रिस जॉर्डन
  21. बिली स्टेनलेक
  22. तन्मय अग्रवाल
  23. श्रीवत्स गोस्वामी
  24. बिपुल शर्मा
  25. मेहेदी हसन
संबंधित बातम्या :

... म्हणून कोलकात्याने गौतम गंभीरला संघात घेतलं नाही

आयपीएलमध्ये गंभीरकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा

जयदेव सर्वाधिक महागडा भारतीय खेळाडू, तब्बल 11.50 कोटींची बोली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
Sangli News: थेट नगराध्यक्ष लढतीसाठी जयंत पाटलांकडून राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
थेट नगराध्यक्ष लढतीसाठी जयंत पाटलांकडून राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
राज ठाकरेंनी संघाचा म्हणत प्रवीण परदेशीला झापलं; मुळशी पॅटर्न फेम अभिनेता पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंनी संघाचा म्हणत प्रवीण परदेशीला झापलं; मुळशी पॅटर्न फेम अभिनेता पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
निवडणुकीला महायुती फिस्कटली, नितेश राणेंमुळेच सिंधुदुर्गात युती नाही; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं
निवडणुकीला महायुती फिस्कटली, नितेश राणेंमुळेच सिंधुदुर्गात युती नाही; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Scam: 'शासकीय जमिनीचा अपहार झाला', पार्थ पवार प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे आदेश
Pawar Land Deal : 'पार्थ पवारांच्या जमीन कागदपत्रांमध्ये गंभीर चुका', सामाजिक कार्यकर्ते Vijay Kumbhar यांचा आरोप
Maharashtra Politics: 'ठाकरेंनी ऐकवली फडणवीस, पवारांची ऑडिओ क्लिप, कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण
Maharashtra Politicsलायकी नसलेला माणूस आमदार, Ramesh Kadam यांचा आमदार Raju Khare यांच्यावर हल्लाबोल
Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल,फडणवीसांचा ठाकरेंना सणसणीत टोला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
Sangli News: थेट नगराध्यक्ष लढतीसाठी जयंत पाटलांकडून राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
थेट नगराध्यक्ष लढतीसाठी जयंत पाटलांकडून राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
राज ठाकरेंनी संघाचा म्हणत प्रवीण परदेशीला झापलं; मुळशी पॅटर्न फेम अभिनेता पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंनी संघाचा म्हणत प्रवीण परदेशीला झापलं; मुळशी पॅटर्न फेम अभिनेता पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
निवडणुकीला महायुती फिस्कटली, नितेश राणेंमुळेच सिंधुदुर्गात युती नाही; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं
निवडणुकीला महायुती फिस्कटली, नितेश राणेंमुळेच सिंधुदुर्गात युती नाही; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: इतके दिवस काय केलं, पद सोडून द्या, काम न करणाऱ्यांना काढून टाका; पुण्यात राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम
इतके दिवस काय केलं, पद सोडून द्या, काम न करणाऱ्यांना काढून टाका; पुण्यात राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम
Eknath Khadse demand Ajit Pawar Resignation : कथित जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा, एकनाथ खडसे यांची मोठी मागणी
पार्थ पवार यांच्या कंपनीची जमीन खरेदी वादात, चौकशी होईपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा : एकनाथ खडसे
Anil Deshmukh On Vote Chori: मध्य प्रदेशातून भाजपनं कार्यकर्ते आणले, काटोल-नरखेड मतदारसंघात 35000 मतांची चोरी; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
मध्य प्रदेशातून भाजपनं कार्यकर्ते आणले, काटोल-नरखेड मतदारसंघात 35000 मतांची चोरी; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी तहसीलदारांचे तात्काळ निलंबन, मुख्यमंत्र्यांचे आदेश
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी तहसीलदारांचे तात्काळ निलंबन, मुख्यमंत्र्यांचे आदेश
Embed widget