Ravindra Jadeja : सर रविंद्र जाडेजा.. 5 षटकार, एक चौकार... हर्षल पटेलच्या एका षटकात 37 धावा
Ravindra Jadeja : चेन्नईचा ऑलराऊंडर रविंद्र जाडेजानं मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज धावांचा अक्षरशा पाऊस पाडला. रविंद्र जाडेजाच्या तुफान फटकेबाजीच्या बळावर चेन्नईनं बंगळुरुसमोर 192 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
CSK vs RCB, IPL 2021 1st Innings Highlights: चेन्नईचा ऑलराऊंडर रविंद्र जाडेजानं मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज धावांचा अक्षरशा पाऊस पाडला. रविंद्र जाडेजाच्या तुफान फटकेबाजीच्या बळावर चेन्नईनं बंगळुरुसमोर 192 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. रविंद्र जाडेजानं हर्षल पटेलच्या शेवटच्या षटकात पाच षटकारांसह 36 धावा वसूल करत संघाला मजबूत धावसंख्या उभारुन दिली.
पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ जोडीनं चेन्नईला चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी या जोडीनं 74 धावांची भागिदारी केली. यजुवेंद्र चहलनं ऋतुराजला बाद करत पहिला धक्का दिला. ऋतुराजनं 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 33 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या सुरेश रैनानं फाफला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र 18 चेंडूत 24 धावा करून सुरेश रैना बाद झाला. त्याने खेळीत 1 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्यानंतरच्या दुसऱ्याच चेंडुवर हर्षल पटेलनं फाफ डूला बाद केलं. त्यानं 41 चेंडूत 50 धावा केल्या.
त्यानंतर आलेल्या रविंद्र जाडेजानं तुफान फटकेबाजी केली. शेवटच्या षटकात त्याने हर्षल पटेलची चांगलीच धुलाई करत 5 षटकार आणि 1 चौकार ठोकत 37 धावा वसूल केल्या. हर्षल पटेलनं या शेवटच्या षटकाआधी तीन विकेट घेत चांगली गोलंदाजी केली होती. मात्र या शेवटच्या षटकात त्याच्या कामगिरीवर रविंद्र जाडेजानं पाणी फेरलं.
अशी झाली शेवटची ओव्हर
पहिला चेंडू- रविंद्र जाडेजानं षटकार ठोकला
दुसरा चेंडू - रविंद्र जाडेजानं षटकार ठोकला
तिसरा चेंडू- रविंद्र जाडेजानं षटकार ठोकला, हा चेंडू नो बॉल
चौथा चेंडू- रविंद्र जाडेजानं षटकार ठोकला
पाचवा चेंडू- रविंद्र जाडेजानं दोन धावा काढल्या
सहावा चेंडू- रविंद्र जाडेजानं षटकार ठोकला
सातवा चेंडू- रविंद्र जाडेजानं चौकार ठोकला