एक्स्प्लोर
IPL 2020, RCBvsDC: दिल्लीची बंगलोरवर 59 धावांनी मात, रबाडाची निर्णायक कामगिरी
दिल्लीने बंगलोरला 197 धावांचं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगलोरचा संघ 137 धावांपर्यंतच मजल मारु शकली.
IPL 2020, RCBvsDC | दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर 59 धावांनी मात केली. दिल्लीने बंगलोरला 197 धावांचं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगलोरचा संघ 137 धावांपर्यंतच मजल मारु शकली. कर्णधार विराट कोहलीची एकाकी झुंज अपयशी ठरली.
कगिसो रबाडाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं बंगलोरचा 59 धावांनी पराभव करत यंदाच्या मोसमात आपला चौथा विजय साजरा केला. या विजयासह दिल्लीनं गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. दिल्लीनं बंगलोरला 197 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगलोरला 9 बाद 136 धावांचीच मजल मारता आली. रबाडानं 24 धावात 4 फलंदाजांना माघारी धाडलं. तर अक्षर पटेल आणि नॉर्तजेनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
त्याआधी दिल्ली कॅपिटल्सनं 20 षटकात चार बाद 196 धावा उभारल्या होत्या. दिल्लीच्या मार्कस स्टॉयनिसनं 26 चेंडूत नाबाद 53 धावांची खेळी केली. तर पृथ्वी शॉनं 42 धावा फटकावल्या. याशिवाय शिखर धवननं 32 तर रिषभ पंतनंही 37 धावांचं महत्वपूर्ण योगदान दिलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement