एक्स्प्लोर
IPL 2019 : बाराव्या मोसमाला सुरुवात, किसमें कितना है दम?
चेन्नईने धोनीच्या नेतृत्वाखाली 2010, 2011 आणि 2018 साली विजेतेपद पटकावलंय. तर रोहित शर्माची मुंबई इंडियन्स 2013, 2015 आणि 2017 साली विजेतेपदाची मानकरी ठरली होती. त्यामुळे यंदाची आयपीएल ट्रॉफी कोण उंचावणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे
मुंबई : 'बीसीसीआय'च्या 'इंडियन प्रीमियर लीग' म्हणजेच आयपीएलच्या बाराव्या मोसमाला आजपासून सुरुवात आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची जगातली सर्वोत्तम लीग अशी ओळख आयपीएलने गेल्या 11 वर्षांमध्ये रुढ केली आहे. इंग्लंडमधल्या आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आयपीएलला एक आगळं महत्त्वही निर्माण झालं आहे.
होळी आणि धुळवड साजरी झाली. आता रंगांची उधळण आयपीएलच्या रणांगणात होणार आहे. आयपीएलच्या बाराव्या मोसमाचं बिगुल वाजलं आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या आठही संघांनी आपापली कंबर कसण्यास सुरुवात केली आहे.
भारतात दरवर्षी भरणारा हा क्रिकेटचा महामेळा यंदा महिनाभर लवकर सुरु होत आहे. बीसीसीआयने भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या वन डे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या वेळापत्रकातही बदल केले आहेत. त्यामुळेच ऐन निवडणुकांच्या धामधुमीत आयपीएलचाही धुरळा उडणार आहे.
IPL 2019 : संपूर्ण वेळापत्रक जाहीर
23 मार्च ते 5 मे दरम्यान आयपीएलच्या साखळी सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात आयपीएलची पहिली ठिणगी पडणार आहे. सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सची व्हिसल यंदाही जोरात वाजेल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर विराट कोहली आणि एबी डिव्हीलियर्ससारख्या मातब्बर शिलेदारांचा समावेश असलेल्या आरसीबीचं नशीब यंदातरी फळफळेल का याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. VIDEO | विधान पूर्ण ऐका, मग बोला, 'त्या' वक्तव्यावर उदयनराजेंचं स्पष्टीकरण आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सने प्रत्येकी तीन वेळा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. चेन्नईने धोनीच्या नेतृत्वाखाली 2010, 2011 आणि 2018 साली विजेतेपद पटकावलंय. तर रोहित शर्माची मुंबई इंडियन्स 2013, 2015 आणि 2017 साली विजेतेपदाची मानकरी ठरली होती. शाहरुख खानची फ्रॅन्चायझी असलेल्या कोलकात्यानं 2012 आणि 2014 साली, हैदराबादने 2009 आणि 2016 साली तर राजस्थान रॉयल्सने 2008 साली आयपीएलची ट्रॉफी उंचावली होती. या यादीत रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरु, किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्सची विजेतीपदाची पाटी अजूनही कोरीच आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये एखादा संघ विजेतेपदावर पुन्हा नाव कोरतोय की बंगळुरु, दिल्ली आणि पंजाब यापैकी कोण आपलं पहिलं विजेतेपद पटकावतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement