INDW vs AUSW ODI : ऑस्ट्रेलियाचे टीम इंडियासमोर 259 धावांचे आव्हान, दीप्ती शर्माचा आक्रमक मारा
INDW vs AUSW ODI : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या कांगारुंनी 50 षटकांअखेर 8 गडी गमावत 258 धावा केल्या आहेत. दरम्यान, भारताच्या दीप्ती शर्माने आक्रमक मारा केला.
INDW vs AUSW ODI : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघातील दुसरा वनडे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या कांगारुंनी 50 षटकांअखेर 8 गडी गमावत 258 धावा केल्या आहेत. दरम्यान, भारताच्या दीप्ती शर्माने (Deepti Sharma) आक्रमक मारा केला. तिने 5 विकेट पटकावल्या. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ऑस्ट्रिलियाकडून, फोएबे लिचफिल्डने 63 धावांची खेळी केली. तिने 6 चौकार लगावले. तर एलिस पेरीनेही 5 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने 50 धावा केल्या. पेरी आणि लिचफिल्डशिवाय इतर कोणत्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
फोएबेची 63 धावांची खेळी
ऑस्ट्रेलियन संघ नाणेफेक जिंकत फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यानंतर सलामीवीर फोएबे लिचफिल्ड (Phoebe Litchfield) आणि कर्णधार एलिसा हिलीने (Alyssa Healy) यांनी चांगली फलंदाजी केली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 40 धावांची भागिदारी रचली. दरम्यान पूजा वस्त्राकारने या भागिदारीला सुरुंग लावला. तिने एलिसाचा त्रिफला उडवला. एलिसा हिलीला केवळ 13 धावा करता आल्या. त्यानंतर फोएबे लिचफिल्ड आणि एलिस पेरीने 77 धावांची भागिदारी रचली. 24 व्या षटकात एलिसा बाद झाली. तिने 50 धावांचे योगदान दिले. फोएबेने 63 धावांचे योगदान दिले. फोएबेच्या खेळीमुळेच कांगारुंना 258 धावांपर्यंत मजला मारता आली.
दीप्ती शर्माचा आक्रमक मारा (Deepti Sharma)
भारताकडून दीप्ती शर्माने आक्रमक मारा केला. तिने 10 षटकांमध्ये 38 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या. तिच्या शिवाय पूजा वस्त्राकार, श्रेयंका पाटील आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 1 विकेट्स पटकावली. दीप्ती शर्माच्या गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन संघाला 258 धावांपर्यंत पोहोचता आले.
श्रेयंका पाटीलचे पदार्पण
टीम इंडियाने दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. टीम इंडियाने श्रेयंका पाटीलला पदार्पणाची संधी दिली आहे. कर्नाटकच्या श्रेयंकाचा देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. ती महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळते. यासोबतच गयाना अॅमेझॉन वॉरियर्सकडूनही खेळली आहे. श्रेयंकाने यावर्षी टीम इंडियासाठी टी-20 पदार्पण केले.
भारतीय संघ -
स्मृती मांदना (Smriti Mandhana), यास्तिका भाटिया, जेमीमी रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, अमनज्योत कौर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकुर सिंग (Renuka Thakur Singh)
ऑस्ट्रेलियाचा संघ -
अॅलेसा हेली (कर्णधार, यष्टीरक्षक), फोएबे लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, तल्हिया मेग्राथ, अॅश्ले गार्डनर, अॅनाबे सुदरलँड, जॉर्जिया वार्हेलम, कीम गार्थ, डार्सी ब्राऊन
इतर महत्वाच्या बातम्या