Rishabh Pant : अपघातातून सावरत दणक्यात पुनरागमन करणार ऋषभ पंत? दिल्ली कॅपटल्सने शेअर केला इमोशनल व्हिडिओ
Rishabh Pant : पंतच्या अपघातानंतर बरोबर एक वर्षानंतर आज (दि.30) दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) एक व्हिडिओ शेअर केला आहे. ऋषभ पंत अपघातातून सावरत असून तो दणक्यात पुनरागमन करण्यासाठी तयार आहे, असे दिल्ली कॅपिटल्सने म्हटलय.
Rishabh Pant : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा (Rishabh Pant) मागील कार अपघात झाला होता. पंतच्या अपघातानंतर बरोबर एक वर्षानंतर आज (दि.30) दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) एक व्हिडिओ शेअर केला आहे. ऋषभ पंत अपघातातून सावरत असून तो दणक्यात पुनरागमन करण्यासाठी तयार आहे, असे दिल्ली कॅपिटल्सने म्हटलय. ऋषभ पंतने यापूर्वी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले आहे. दिल्लीने ऋषभला आयपीएल ऑक्शनदरम्यान रिटेन केले आहे. त्यामुळे आगामी आयपीएलमध्ये ऋषभ दिल्लीकडून मैदानात उतरणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
ऋषभ सहजासहजी हार मानणार नाही
दिल्ली कॅपिटल्सने (Rishabh Pant) ऋषभ पंतबाबत एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. या पोस्टमध्ये दिल्लीने म्हटले की, "तो भयावह अपघात होऊन 365 दिवस उलटले आहेत. अपघात झाल्यामुळे पुनरागमन करण्यासाठी जोरदार मेहनत करतोय. त्याला विश्वास आहे की, पुन्हा एकदा त्याच दमाने तो मैदानात उतरेल. तो सहजासहजी हार मानणारा नाही. लवकरच ऋषभ पंत आयपीएलमध्ये दमदार पुनरागमन करेल." या व्हिडिओमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) खेळाडू डेव्हिड वॉर्नर आणि अक्षर पटेलने ऋषभ पंतबाबत भाष्य केले आहे. शिवाय दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पॉटिंग आणि सौरव गांगुली यांनी ऋषभला पुनरागमन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षर पटेलने पंतबाबत म्हटले की, सकाळी 7 वा. माझ्या प्रतिमा दीदीने मला कॉल केला. तिने मला विचारले की, ऋषभबरोबर तुझे शेवटचे संभाषण कधी झाले होते. मी तिला म्हटले की, मी त्यालाच कॉल करणार होतो, पण नाही केला. दीदीने म्हटले ऋषभच्या आईचा मोबाईल नंबर पाठव. मला त्यावेळी वाटले होते ऋषभ या अपघातातून सावरणार नाही. बीसीसीआय आणि शार्दुलसह सर्वांनी मला कॉल केला. सर्वांना वाटत होते की, ऋषभने अपघात होण्यापूर्वी माझ्याशी संभाषण केले असेल. त्यानंतर माझी पंतशी बातचीत झाली. तेव्हा मला समजले की, सर्वकाही ठीक आहे. त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर माझ्या जीव भांड्यात पडला.
View this post on Instagram
गेल्या हंगामात दिल्लीचा पंतची उणीव भासली
वर्षभरापासून ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. ऋषभ पंत (Rishabh Pant) फक्त आयपीएलला मुकला नाही तर भारतीय संघाने खेळलेल्या 62 आंतरराष्ट्रीय सामन्या केवळ प्रेक्षक म्हणून सहभागी होऊ शकला. गेल्या मोसमात पंतची अनुपस्थिती दिल्ली फ्रँचायझीला जाणवली. पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सची अवस्था बिकट झाली. गेल्या मोसमात दिल्लीचा संघ 9व्या स्थानावर होता. यंदाच्या हंगामात दिल्लीचा संघ चांगली कामगिरी करण्यासाठी मैदानात उतरेल.
इतर महत्वाच्या बातम्या