एक्स्प्लोर
Advertisement
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव आटोपला, भारतासमोर 441 धावांचं लक्ष्य
पुणे: पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 285 धावांवर आटोपला आहे. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 441 धावांचं भलं मोठं आव्हान आहे.
कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या खणखणीत शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 87 षटकात सर्वबाद 285 धावांची मजल मारली. स्मिथने 109 धावा केल्या.
भारताकडून अश्विनने चार, रवींद्र जाडेजाने 3, उमेश यादवने 2 तर जयंत यादवने 1 विकेट घेतली. कसोटीचा आजचा तिसरा दिवस आहे.
ऑस्ट्रेलियाने आज 4 बाद 143 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. रवींद्र जाडेजाने मिचल मार्शला (31) बाद करुन पाचवा, तर उमेश यादवने मॅथ्यू वेडला तंबूत पाठवत ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का दिला.
मात्र दुसरीकडे कर्णधार स्टीव्ह स्मिथ खिंड लढवत होता. स्मिथने आधी रेन शॉ आणि मग मार्शच्या साथीने शतकाकडे वाटचाल केली. स्मिथने 187 चेंडूत खणखणीत शतक झळकावलं.
स्मिथचं हे कसोटीतील 18 वं तर भारताविरुद्धचं पाचवं शतक आहे. तर कर्णधारपदी विराजमान झाल्यापासून हे त्याचं दहावं शतक आहे.
शतकानंतर स्मिथने हात खोलून फटकेबाजीला सुरुवात केली. मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात तो तंबूत परतला. स्मिथला जाडेजाने पायचित केलं.
यानंतर मग मिचेल स्टार्कला (30) अश्विनने, नॅथन लायनला (13) उमेश यादवने तर ओकिफी (6) जाडेजाने माघारी धाडत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला.
ऑस्ट्रेलियाचं हे भलं मोठं लक्ष्य दोन दिवसात पेलण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. त्यामुळे दोन दिवस भारतीय फलंदाज मैदानात उभी राहते का ते पाहणं महत्त्वाचं आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ
तत्पूर्वी डावखुरा स्पिनर स्टीव्ह ओ'कीफ आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ या दोघांनी ऑस्ट्रेलियाला दुसऱ्याच दिवशी पुण्याच्या पहिल्या कसोटीवर वर्चस्व मिळवून दिलं. आधी स्टीव्ह ओ'कीफनं 35 धावांत सहा फलंदाजांना माघारी धाडून टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 105 धावांत गुंडाळला.
त्यामुळं ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात तब्बल 155 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर स्टीव्ह स्मिथनं मॅट रेनशॉ आणि मिचेल मार्शच्या साथीनं ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या दिवसअखेर चार बाद 143 धावांची मजल मारून दिली.
त्यामुळं पुण्याच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी 298 धावांचीच झाली होती. पण विशेष म्हणजे कांगांरूंच्या हाताशी अजूनही सहा विकेट्स असून, या कसोटीत तीन दिवसांचा खेळ शिल्लक आहे. परिणामी पुण्याच्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड घट्ट झाली.
भारताची पहिल्या डावातील फलंदाजी
पुणे कसोटीत सलामीच्या लोकेश राहुलचा अपवाद वगळला, तर भारतीय रथीमहारथी सपशेल अपयशी ठरले. भारताच्या 105 धावांमध्ये राहुलचं एकट्याचं योगदान 64 धावांचं होतं. भारताच्या दहा फलंदाजांनी मिळून केवळ 40 धावांची भर घातली.
राहुल बाद झाला तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या 4 बाद 95 अशी होती. पण भारतानं आपल्या अखेरच्या सात विकेट्स अवघ्या 11 धावांतच गमावल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement