एक्स्प्लोर

रायुडूच्या जागी रैनाला संधी, आज रोहित शर्माची 'कसोटी'

काही वैयक्तिक कारणांमुळे 15 जूनला झालेल्या यो-यो टेस्टसाठी रोहित उपस्थित राहू शकला नव्हता. याबाबत त्याने बीसीसीआयकडून परवानगी घेतली होती.

मुंबई : भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याची आज यो-यो टेस्ट होणार आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे 15 जूनला झालेल्या यो-यो टेस्टसाठी रोहित उपस्थित राहू शकला नव्हता. याबाबत त्याने बीसीसीआयकडून परवानगी घेतली होती. सर्व खेळाडूंनी एकाच दिवशी ही टेस्ट दिली पाहिजे, असा कोणताही नियम नाही. रोहितने वैयक्तिक कार्यक्रम असल्याची कल्पना बीसीसीआयला दिली होती. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली. रायुडूच्या जागी रैनाला संधी यो-यो टेस्टमध्ये नापास झाल्यानंतर अंबाती रायुडूला इंग्लडविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आलं आहे. त्याच्या जागी अनेक दिवसांपासून संघाबाहेर असणाऱ्या सुरेश रैनाला संधी देण्यात आली. सुरेश रैनाचं तब्बल अडीच वर्षांनंतर एकदिवसीय संघात पुनरागमन होत आहे. रायुडूला या फिटनेस चाचणीत पात्र ठरण्यासाठी 16.1 गुण मिळवणे आवश्यक होतं. मात्र त्याला 14 गुण मिळाल्याने संघातील स्थान गमवावं लागलं. आयपीएलमध्ये रायुडूने धमाकेदार कामगिरी करत 602 धावा फटकावल्या होत्या. याच कामगिरीच्या जोरावर इंग्लंडविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली होती. रैनाने अखेरचा वन डे सामना 25 ऑक्टोबर 2015 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. आयपीएलमध्ये तो चांगल्या फॉर्मात दिसून आला. रैनाने आतापर्यंत खेळलेल्या 223 वन डे सामन्यांमध्ये 5568 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये पाच शतक आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक 3 जुलैपासून भारतीय संघाचा इंग्लंड दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन टी-20 सामने आणि तीन वन डे सामने खेळणार आहे. टी-20 सामने पहिला टी-20 सामना : 3 जुलै दुसरा टी-20 सामना : 6 जुलै तिसरा टी-20 सामना : 8 जुलै वन डे सामने पहिला वन डे सामना : 12 जुलै दुसरा वन डे सामना : 14 जुलै तिसरा वन डे सामना : 17 जुलै दरम्यान, इंग्लंडविरुद्ध 1 ऑगस्टपासून पाच सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवण्यात येणार आहे. मात्र या मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन , रोहित शर्मा , केएल राहुल , श्रेयस अय्यर , सुरेश रैना , एमएस धोनी (विकेटकीपर), दिनेश कार्तिक , युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव संबंधित बातम्या :

... म्हणून भारतीय संघात रोहित शर्माऐवजी करुण नायरला संधी

सिद्धार्थ कौलला संधी, तीन मालिकांसाठी भारतीय संघ जाहीर

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
Yashveer Goud : हमजा जहूरसमोर आक्रमक बाणा का दाखवला? टीम इंडियाच्या यशवीर गौडनं आक्रमक जल्लोषाचं कारण सांगत म्हणाला...
हमजा जहूरसमोर आक्रमक बाणा का दाखवला? यशवीर गौडनं आक्रमक जल्लोषाचं कारण सांगत म्हणाला...
Siraj : तिरंग्याचा मान राखण्यासाठी मोहम्मद सिराज धावला, सुरक्षा रक्षकाच्या हातातून तिरंगा खेचला, नेटकऱ्यांकडून सिराजचं कौतुक Video 
तिरंग्याचा अपमान होतोय ते पाहताच सिराजची धाव, सुरक्षारक्षकाच्या हातून राष्ट्रध्वज काढून घेतला, व्हिडिओ व्हायरल
भारतीय क्रिकेट संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा! न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवताच रचला इतिहास, नावार केले चार मोठे विक्रम
भारतीय क्रिकेट संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा! न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवताच रचला इतिहास, नावार केले चार मोठे विक्रम

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
Jitendra Awhad : डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा म्हणजे देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच, नताशा आव्हाड यांची पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
नताशा आव्हाड यांची डिलिमिटेशन विरोधात पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Embed widget