एक्स्प्लोर
सुधारणा करा, अन्यथा आमच्याकडे पर्याय तयार, निवडकर्त्यांचा खेळाडूंना इशारा
इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत 1-4 ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर निवडकर्त्यांनी हा पवित्रा घेतला आहे. बीसीसीआयच्या भारतीय क्रिकेट संघ निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना हे मत मांडलं.
![सुधारणा करा, अन्यथा आमच्याकडे पर्याय तयार, निवडकर्त्यांचा खेळाडूंना इशारा indian chief selector msk prasad issues warning to under performers सुधारणा करा, अन्यथा आमच्याकडे पर्याय तयार, निवडकर्त्यांचा खेळाडूंना इशारा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/16200854/team-india.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : सलग संधी देऊनही चांगली कामगिरी न झाल्यास दुसऱ्या खेळाडूंना संधी दिली जाईल, असा स्पष्ट इशारा भारतीय क्रिकेट संघाच्या निवडकर्त्यांनी दिला आहे. इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-4 ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर निवडकर्त्यांनी हा पवित्रा घेतला आहे.
बीसीसीआयच्या भारतीय क्रिकेट संघ निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना हे मत मांडलं. भारतीय गोलंदाज इंग्लंडमधील आपल्या चांगल्या कामगिरीची पुनरावृत्ती ऑस्ट्रेलियातही करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय संघाने चांगली कामगिरी केली, मात्र परिणाम वेगळाच होता, असं ते म्हणाले.
ऑस्ट्रेलिया दौरा लक्षात घेता कसोटीतील प्रमुख फलंदाजांना सरावासाठी जास्त वेळ देण्याचा प्रयत्न असेल, असं एमएसके प्रसाद म्हणाले. त्यामुळे प्रमुख फलंदाजांना सरावासाठी ऑस्ट्रेलियात अगोदरच पाठवलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोणत्याही खेळाडूला भारतीय संघात स्वतःला सिद्ध करण्यासाठी पूर्ण संधी दिली जाते. स्वतःला सिद्ध न करु शकल्यास युवा खेळाडूंकडे पाहिलं जातं, असं एमएसके प्रसाद यांनी सांगितलं.
इंग्लंड दौऱ्यात दोन्हीही संघाच्या (इंग्लंड आणि भारत) सलामीवीर जोडीचं प्रदर्शन चांगलं नव्हतं, असं म्हणत त्यांनी भारतीय सलामीवीर जोडीचा बचावही केला. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी मधल्या फळीत चांगली कामगिरी केली आणि इंग्लंडमध्ये ते अजून चांगलं खेळू शकत होते, असं ते म्हणाले.
एमएसके प्रसाद यांनी मयंक अग्रवालच्या समावेशाचेही संकेत दिले. तो सध्या जबरदस्त फॉर्मात आहे, मात्र सिनिअर टीममध्ये जागा मिळवू शकलेला नाही. त्याच्यावर नजर असून लवकरच तो भारतीय संघात असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
विश्वचषकासाठी ब्ल्यू प्रिंट तयार
चौथ्या क्रमांकाचा फलंदाज ही भारतीय वन डे संघाची सर्वात मोठी समस्या आहे. 2015 च्या विश्वचषकानंतरच या जागेसाठी अनेक प्रयोग केले, मात्र यश आलं नाही. निवड समितीकडून विश्वचषकासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आल्याचं एमएसके प्रसाद यांनी सांगितलं.
विश्वचषकापूर्वी भारत जवळपास 24 वन डे सामने खेळणार आहे आणि आम्ही त्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. संघात काही जागा रिकाम्या आहेत, ज्या भरायच्या आहेत, असं एमएसके प्रसाद म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वाशिम
महाराष्ट्र
भारत
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)