एक्स्प्लोर

INDvsSL : टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर, श्रीलंका 3 बाद 31

भारतानं श्रीलंकेचा पहिला डाव 373 धावांत गुंडाळून पहिल्या डावात 163 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळं दिल्ली कसोटीत भारताची एकूण आघाडी 409 धावांची झाली.

दिल्ली : विराट कोहलीच्या टीम इंडियासाठी दिल्ली कसोटीत विजयाचं दार किलकिलं झालं आहे. या कसोटीत भारतानं श्रीलंकेला विजयासाठी 410 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण श्रीलंकेची चौथ्या दिवसअखेर तीन बाद 31 अशी उडालेली घसरगुंडी पाहता, दिल्ली कसोटीत टीम इंडियाचा विजय निश्चित मानला जात आहे. मोहम्मद शमीनं सलामीच्या समरविक्रमाची विकेट काढून श्रीलंकेला पहिला धक्का दिला. मग रवींद्र जाडेजानं करुणारत्ने आणि लकमलला माघारी धाडून श्रीलंकेची अवस्था आणखी बिकट केली. त्याआधी, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं भारताचा दुसरा डाव पाच बाद 246 धावांवर घोषित केला. भारतानं श्रीलंकेचा पहिला डाव 373 धावांत गुंडाळून पहिल्या डावात 163 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळं दिल्ली कसोटीत भारताची एकूण आघाडी 409 धावांची झाली. टीम इंडियाला आघाडी मिळवून देण्यात शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी मोलाची भूमिका बजावली. धवननं ६७ धावांची, पुजारानं ४९ धावांची, विराटनं ५० धावांची, तर रोहितनं नाबाद ५० धावांची खेळी उभारली. सलामीवीर मुरली विजय आणि तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आलेला अजिंक्य रहाणे स्वस्तात माघारी परतले. त्यामुळं भारताची दुसऱ्या डावात दोन बाद २९ अशी घसरगुंडी उडाली होती. त्या परिस्थितीत धवन आणि पुजारानं तिसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी रचून भारतीय डावाला आकार दिला. पुजारानं पाच चौकारांसह ४९ धावांची, तर धवननं पाच चौकार आणि एका षटकारासह ६७ धावांची खेळी उभारली. दरम्यान श्रीलंकेचा पहिला डाव 373 धावांत संपुष्टात आला. श्रीलंकेनं कालच्या 9 बाद 356 या धावसंख्येत केवळ 17 धावांची भर घातली. ईशांत शर्मानं कर्णधार दिनेश चंडिमलला माघारी धाडत भारताला पहिल्या डावात 163 धावांची आघाडी मिळवून दिली. चंडिमलनं 21 चौकार आणि एका षटकारासह 164 धावांची दमदार खेळी उभारली. भारताकडून ईशांत शर्मा, रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी तीन तर मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजानं दोन प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. दरम्यान टीम इंडियानं दुसऱ्या डावात मुरली विजयची आणि रहाणेची विकेट गमावताना 34 धावा जमवल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs NZ T20 Series: भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
IND vs WI 1st T20 : श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
IND vs WI 1st T20I Score : टीम इंडियाचा 8 विकेट्सनी दणदणीत विजय
टीम इंडियाचा 8 विकेट्सनी दणदणीत विजय
IND Squads vs NZ Tour : बीसीसीआयची मोठी घोषणा! न्यूझीलंड दौऱ्यासाठी 2 टीम जाहीर, ध्रुव जुरेलकडे भारत ‘अ’ संघाची धुरा, वाचा संपूर्ण Squad
बीसीसीआयची मोठी घोषणा! न्यूझीलंड दौऱ्यासाठी 2 टीम जाहीर, ध्रुव जुरेलकडे भारतीय संघाची धुरा, वाचा संपूर्ण Squad

व्हिडीओ

Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले..
पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले, We will do it!
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
Rohit Pawar :
"तो भाजपच्या नेत्याचा कार्यकर्ता, त्या नेत्याचं अर्थकारण बघतो, पालिकेची कामं घेतो"; एमपीएससी आंदोलनाविरोधात कोर्टात गेलेल्या याचिकाकर्त्याची कुंडली रोहित पवारांनी काढली
Beed: बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
RBI Repo Rate: गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
Rohit Pawar: काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
Uday Samant On Vivekanand Patil MPSC Protest Pune: विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
Nashik Crime News: नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
Embed widget