एक्स्प्लोर
धोनीची 300 वी मॅच सुरु, शार्दूल इन, केदार आऊट
श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वन डेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
कोलंबो: श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वन डेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. मूळचा पालघरचा आणि मुंबईकडून खेळणारा शार्दूल ठाकूर या सामन्यातून वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण साजरं करेल.
याशिवाय मनिष पांडे आणि कुलदीप यादव या दोघांनाही संधी देण्यात आली आहे.
केदार जाधव, यजुवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती देण्यात आली आहे.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीतला हा तीनशेवा वन डे सामना असेल. त्यामुळं या सामन्यात धोनी कशी कामगिरी बजावतो, ही टीम इंडियाच्या चाहत्यांची मुख्य उत्सुकता राहिल.
धोनी कोलंबोच्या मैदानात उतरताच सामन्यांचं त्रिशतक पूर्ण करणार!
भारत आणि श्रीलंका संघांमधला चौथा वन डे सामना आज कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीतला हा तीनशेवा वन डे सामना आहे. त्यामुळे या सामन्यात धोनी कशी कामगिरी बजावतो, ही टीम इंडियाच्या चाहत्यांची मुख्य उत्सुकता राहिल.
कॅण्डीच्या लागोपाठ दोन वन डे सामन्यांमध्ये मॅचफिनिशरची भूमिका बजावणारा टीम इंडियाचा विघ्नहर्ता महेंद्रसिंग धोनी आता ‘क्लब थ्री हण्ड्रेड’मध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झालाय.
वन डे क्रिकेटच्या इतिहासात एक सर्वोत्तम मॅचफिनिशर अशी धोनीची ओळख आहेच. पण कोलंबोत आणखी एक जबरदस्त कामगिरी बजावून वन डे सामन्यांचं त्रिशतक साजरं करण्याचा धोनीचा इरादा राहिल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement