एक्स्प्लोर

India vs Sri lanka : श्रीलंकेचा सुपडा साफ करणार टीम इंडिया! आज तिसरी अन् शेवटची वनडे, 'या' खेळाडूंना संधी?

India vs Sri lanka : श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत आजचा तिसरा आणि अंतिम सामना जिंकून श्रीलंकेचा सुपडा साफ करण्याच्या उद्देशानं टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.

India vs Sri lanka : श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत पहिले दोन्ही सामने जिंकून टीम इंडियाने विजयी आघाडी घेतली आहे. आता आजचा तिसरा आणि अंतिम सामना जिंकून श्रीलंकेचा सुपडा साफ करण्याच्या उद्देशानं टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल होण्याची देखील शक्यता आहे.  

शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिला सामना सात गडी राखून जिंकला. या सामन्यात शिखर धवनसह पृथ्वी शॉ, ईशान किशननं शानदार खेळी केली. दुसऱ्या सामन्यात  दीपक चहरच्या नाबाद 69 धावांच्या खेळीमुळे पराभवाच्या दिशेनं चाललेल्या टीम इंडियाला विजय मिळाला.  त्यामुळं आजच्या सामन्यात पृथ्वी शॉलाच सलामीला पाठवावे की त्याच्या जागी देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यापैकी एकाला संधी देतील याकडे लक्ष लागले आहे. सोबतच विकेटकिपर फलंदाज इशान किशनच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळू शकते.  संघातील युवा गोलंदाज नवदीप सैनी किंवा चेतन सकारिया यांना देखील संधी मिळू शकते. 

किती वाजता सुरु होणार सामना
भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 3 तीन वाजता सुरु होईल. 

कुठे पाहू शकाल सामना
भारत आणि श्रीलंकेदरम्यान खेळला जाणारा हा सामना आपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनलवर पाहू शकणार आहात. हे सामने या नेटवर्कवर आपण हिंदी आणि इंग्लिश कॉमेंट्रीसोबत पाहायला मिळेल.  या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग सोनी लिव्ह अॅप आणि त्यांच्या वेबसाईटवर पाहू शकाल. सोबतच आपण लाईव्ह स्कोर आणि अपडेट https://www.abplive.com  वर देखील पाहू शकाल.

असे आहेत संघ
भारत : शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, नितीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, कृष्णप्पा गौतम, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, चेतन सकारिया, नवदीप सैनी.

श्रीलंका : दसून शनाका (कर्णधार), धनंजया डी सिल्व्हा, अविष्का फर्नाडो, भानुका राजपक्षा, पथुम निसांका, चरिथ असलंका, वाहिंदू हसरंगा, अशेन बंदारा, मिनोद भानुका, लाहिरू उडारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, दुशमंथा चमीरा, लक्षण संदकन, अकिला धनंजया, शिरन फर्नाडो, धनंजया लक्षण, इशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रमा, असिथा फर्नाडो, कसून रजिथा, लाहिरू कुमारा, इसुरू उडाना.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 5th T20 : मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
Brendan Taylor Record : फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज
फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज
IND vs WI 5th T20 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचही टी-20 सामन्यात बाहेर बसवलं; श्रेयस अय्यरने वैभव सूर्यवंशीला समजवलं, काय काय म्हणाला?
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचही टी-20 सामन्यात बाहेर बसवलं; श्रेयस अय्यरने वैभव सूर्यवंशीला समजवलं, काय काय म्हणाला?
IND vs WI 5th T20 : शाई होप नंबर 1, अभिषेक शर्मा OUT; टॉप-5 मध्ये टीम इंडियातील 3 जणांचा समावेश, इतिहास-भूगोल बदलणारी भारत आणि वेस्ट इंडिजची मालिका
शाई होप नंबर 1, अभिषेक शर्मा OUT; टॉप-5 मध्ये टीम इंडियातील 3 जणांचा समावेश, इतिहास-भूगोल बदलणारी भारत आणि वेस्ट इंडिजची मालिका

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
Embed widget