एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
19 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान आमनेसामने
या सामन्याच्या एक दिवस अगोदरच, भारतीय संघाच्या मालिकेची सुरुवात क्वालीफायर विरुद्धच्या सामन्याने सुरु होईल.
मुंबई : आशिया चषकातील गतविजेता भारतीय संघ यावेळच्या मालिकेत 19 सप्टेंबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत भिडणार आहे. या सामन्याच्या एक दिवस अगोदरच, भारतीय संघाच्या मालिकेची सुरुवात क्वालीफायर विरुद्धच्या सामन्याने सुरु होईल.
भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचं मालिकेत खेळणं निश्चित आहे. मात्र उर्वरित स्थानांसाठी यूएई, सिंगापूर, ओमान, नेपाळ, मलेशिया आणि हाँगकाँग यांच्यात लढत होणार आहे. क्वालीफायर सामन्यांनंतर या संघांपैकी कोण जागा मिळवतं, ते निश्चित होईल.
अ गटात भारत, पाकिस्तान, क्वालिफायर करणारा संघ आणि ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांना स्थान मिळालं आहे. या मालिकेतील पहिला सामना 15 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळवला जाईल, तर अंतिम सामना 28 सप्टेंबरला असेल.
प्रत्येक गटातील टॉपला असलेले दोन संघ सुपर चारसाठी क्वालीफाय होतील. त्यानंतर या सामन्यांमधील विजेत्या संघांमध्ये चषक विजयासाठी लढत होईल.
आशिया चषकाचं वेळापत्रक
ग्रुप राऊंड
15 सप्टेंबर : बांगलादेश वि.श्रीलंका (दुबई)
16 सप्टेंबर : पाकिस्तान वि. क्वालीफायर (दुबई)
17 सप्टेंबर : श्रीलंका वि. अफगाणिस्तान(अबु धाबी)
18 सप्टेंबर : भारत वि. क्वालीफायर (दुबई)
19 सप्टेंबर : भारत वि. पाकिस्तान (दुबई)
20 सप्टेंबर : बांगलादेश वि. अफगाणिस्तान (अबु धाबी)
21 सप्टेंबर : गट अ विजेता वि. गट ब उप विजेता (दुबई), गट ब विजेता वि. गट अ उप विजेता (अबु धाबी)
23 सप्टेंबर : गट अ विजेता वि. गट अ उप विजेता (दुबई), गट ब विजेता वि. गट ब उप विजेता (अबु धाबी)
25 सप्टेंबर : गट अ विजेता वि. गट ब विजेता (दुबई)
26 सप्टेंबर : गट अ उप विजेता वि. गट ब उप विजेता (अबु धाबी)
28 सप्टेंबर : फायनल (दुबई)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement