एक्स्प्लोर
Advertisement
टीम इंडियाची घसरगुंडी, पहिल्या दिवअखेर भारताच्या 9 बाद 291 धावा
कानपूर: कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी किवी गोलंदाजांनी टीम इंडियाची घसरगुंडी उडवली. त्यामुळे भारताची पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात 9 बाद 291 अशी अवस्था झाली. या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया उपाहारापर्यंत एक बाद 105 अशा भक्कम स्थितीत होती. पण त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात न्यूझीलंडच्या गोलंदाजांचंच वर्चस्व पाहायला मिळालं.
भारताकडून मुरली विजयने सर्वाधिक 65 धावांची आणि चेतेश्वर पुजारानं 62 धावांची खेळी केली. तर रविचंद्रन अश्विनने 40 धावांची खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा रवींद्र जाडेजा 11 धावांवर तर उमेश यादव आठ धावांवर खेळत होता.
------------------------------------
कानपूर कसोटीत न्यूझीलंडनं जबरदस्त कमबॅक केलं आहे. भारतानं पाच गडी गमावून 210 धावांपर्यंत मजल मारली आहे. रोहित शर्मा आणि अश्विन सध्या मैदानात आहेत. या सामन्यात उपाहारापर्यंत भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. पण उपाहारानंतर किवी गोलंदाजांनी भारताला एकापाठोपाठ एक दणके देण्यास सुरुवात केली.
- भारताला सातवा धक्का, रिद्धिमान साहा भोपळाही न फोडता तंबूत
- भारताचा सहावा गडी बाद, रोहित शर्मा 35 धावांवर बाद
पुजारा 62, मुरली विजय 65 आणि विराट कोहली अवघ्या नऊ धावांवर माघारी परतले. त्यानंतर रहाणेही 18 धावांवब बाद झाला. न्यूझीलंडसाठी मिचेल सॅन्तनरनं दोन, तर नील वॅगनर आणि ईश सोढीनं आणि क्रेगनं प्रत्येकी एक विकेट काढली. भारतासाठी पुजारा आणि विजयनं दुसऱ्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी रचली.
कानपूर कसोटीत टीम इंडियानं उपाहारापर्यंत एक बाद 105 धावांची मजल मारली आहे. चेतेश्वर पुजारा 34 आणि मुरली विजय 39 धावांवर खेळत आहेत. याआधी भारताचा सलामीवीर लोकेश राहुल 32 धावांवर माघारी परतला.
- भारताला मोठा धक्का, कर्णधार विराट कोहली अवघ्या 9 धावांवर बाद, भारत 168/3
- भारताला दुसरा धक्का, चेतेश्वर पुजारा 62 धावांवर बाद
- भारताला पहिला धक्का, सलामीवर लोकेश राहुल 32 धावांवर बाद
भारतीय संघ आज 500वी कसोटी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. या ऐतिहासिक कसोटीत टीम इंडियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघ: मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, आर. अश्विन, वृद्धिमान साहा, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव
न्यूझीलंड संघ: लॅथम, मार्टीन गप्टील, केन विल्यमसन, रॉस टेलर, ल्यूक राँची, सॅन्टनर, वॅटलिंग, क्रेग, इंदरबीर सोधी, टेंट्र बोल्ट, वॅगनेर
विराट कोहलीची टीम इंडिया आणि केन विल्यमसनची न्यूझीलंड टीम आता कसोटीच्या मैदानात आमने-सामने येणार आहेत. भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना आजपासून कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. ही लढाई म्हणजे भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली पाचशेवी कसोटी असून या सामन्यासाठी उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशननं खास सेलिब्रेशनची तयारी केली आहे. भारताच्या सर्व माजी कर्णधारांनाही या कसोटीसाठी आमंत्रण देण्यात आलं आहे.
कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजीला मदत करणारी ठरेल असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळंच विराट कोहलीनं भारताच्या अंतिम अकरा जणांच्या संघात रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा आणि अमित मिश्रा या तिन्ही फिरकी गोलंदाजांचा समावेश केला तर आश्चर्य वाटायला नको.
दरम्यान, टीम इंडियात सलामीवीराच्या भूमिकेत शिखर धवन, मुरली विजय आणि लोकेश राहुल या तिघांपैकी कुणाला संधी मिळते हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. दुलीप ट्रॉफीत द्विशतक ठोकणारा चेतेश्वर पुजारा आणि कसोटी क्रिकेटमध्ये जम बसवण्यासाठी धडपडणारा रोहित शर्मा यांच्या कामगिरीवरही क्रिकेट चाहत्यांची नजर राहील. टीम इंडियानं नुकतंच वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या मालिकेत वेस्ट इंडिजला 2-0 असं हरवलं होतं. आपला हाच फॉर्म कायम राखण्यासाठी भारतीय खेळाडू उत्सुक आहेत.
केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाला सध्या फॉर्म आणि फिटनेसच्या समस्यांनी ग्रासलं आहे. किवींचा अनुभवी फलंदाज मार्टिन गप्टिल मुंबईविरुद्ध सराव सामन्यांत 21 चेंडूंवरच बाद झाला होता. तर वेगवान गोलंदाज टिम साऊदी आणि अष्टपैलू जिमी निशामला दुखापत झाल्यानं न्यूझीलंडच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. त्यात आकडेवारीही न्यूझीलंडच्या बाजूनं नाही.
गेल्या चौदा वर्षांत न्यूझीलंडला भारतात एकही कसोटी जिंकता आलेली नाही. भारत आणि न्यूझीलंडच्या संघांमध्ये आजवर झालेल्या 54 कसोटी सामन्यांमध्येही भारताचं पारडं जड आहे. भारतानं न्यूझीलंडविरुद्ध 18 कसोटी जिंकल्या असून, 10 वेळाच भारताला पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही संघांमधल्या 26 कसोटी अनिर्णित राहिल्या.
- मुरली विजय आणि पुजारानं झळकावलं अर्धशतक, भारत 137 धावा 1 बाद
न्यूझीलंडसाठी मिचेल सॅन्तनरनं एक विकेट काढली. कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवरची ही लढाई म्हणजे भारताची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली पाचशेवी कसोटी आहे. हा सामना सुरु होण्याआधी भारताच्या सर्व माजी कर्णधारांचा सत्कार करण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बातम्या
निवडणूक
निवडणूक
Advertisement