एक्स्प्लोर

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीसाठी रांची सज्ज

रांची : बंगळुरू कसोटीतल्या विजयाने आत्मविश्वास उंचावलेली टीम इंडिया आजपासून (गुरुवार) तिसऱ्या कसोटीच्या आव्हानाला सामोरी जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली ही तिसरी कसोटी रांचीच्या मैदानात खेळवण्यात येईल. पुणे आणि बंगळुरूच्या पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांच्या पार्श्वभूमीवर रांचीच्या तिसऱ्या कसोटीतही खेळपट्टीची भूमिका आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू राहील. आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी पुण्याची खेळपट्टी निकृष्ट दर्जाची होती, असा शेरा आपल्या अहवालात दिला होता. त्यापाठोपाठ बंगळुरूची खेळपट्टीही दर्जाहीन असल्याचा शेरा त्यांनी दिला. या दोन्ही खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. रांचीची खेळपट्टीही फिरकी गोलंदाजांना अनुकूल ठरण्याचा अंदाज आहे. यजमान झारखंड क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी मात्र ही कसोटी पाच दिवस चालेल, या मुद्यावर ठाम आहेत. विराटच्या फॉर्मबाबत चिंता रवींद्र जाडेजा आणि रवीचंद्रन अश्विन या फिरकी अस्त्रांना बंगळुरु कसोटीत गवसलेली लय पाहून टीम इंडियाला नवी उभारी मिळाली असली तरी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म हा अजूनही भारतीय संघव्यवस्थापनाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधल्या चार डावांमध्ये मिळून विराटने केवळ 40 धावा केल्या आहेत. यंदाच्या मोसमात विराट जबरदस्त फॉर्मात होता. पुणे कसोटीआधी त्याने नऊ कसोटी सामन्यांमध्ये मिळून 1457 धावांचा रतीब घातला होता. पण पुणे कसोटीपासून विराटच्या धावांचा ओघ आटला आणि त्याच्या टीम इंडियाला तब्बल 19 कसोटी सामन्यांनंतर पहिल्यांदा पराभवाची कटू चवही चाखायला लागली. भारतीय संघाने बंगळुरु कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधली असली तरी विराटला दोन्ही डावांत त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावता आलेली नाही. त्यामुळे रांचीत टीम इंडियाला आपल्या कर्णधाराकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. रांची कसोटीत मुरली विजयचं पुनरागमन? विराट कोहलीची बॅट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये तळपलेली नसली, तरी सलामीच्या लोकेश राहुलचा फॉर्म ही भारतीय संघाच्या दृष्टीनं समाधानाची बाब आहे. राहुलने चार डावांमध्ये मिळून तीन अर्धशतकांसह 215 धावा केल्या आहेत. रांची कसोटीतही त्याने भारतीय डावाचा भक्कम पाया घालावा, अशी संघव्यवस्थापनाला अपेक्षा आहे. टीम इंडियाच्या सुदैवाने सलामीवीर मुरली विजय खांद्याच्या दुखापतीतून सावरला असून, रांची कसोटीत तो भारतीय संघात पुनरागमन करण्याची चिन्हं आहेत. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला बंगळुरू कसोटीत गवसलेला सूर भारताच्या दृष्टीने जमेची बाजू ठरली. त्या दोघांनी पाचव्या विकेटसाठी केलेली 118 धावांची भागीदारी बंगळुरू कसोटीला कलाटणी देणारी ठरली होती. टीम इंडियाला पुजारा आणि रहाणेकडून रांचीतही खंबीर खेळीची अपेक्षा राहील. ऑस्ट्रेलिया संघात मिचेल मार्शऐवजी ग्लेन मॅक्सवेलला संधी? ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आणि मिचेल मार्शला दुखापतीच्या कारणास्तव भारत दौऱ्यातून घ्याव्या लागलेल्या माघारीमुळे ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणात असमतोल निर्माण झाला आहे. स्टार्कच्या अनुपस्थितीत पॅट कमिन्सला संधी देण्यात आली आहे. 2011 साली दक्षिण आफ्रिकेत सात विकेट्स घेऊन पदार्पण करणारा कमिन्स त्यानंतर पहिल्यांदाच कसोटी सामन्यात खेळणार आहे. मिचेल मार्शऐवजी ग्लेन मॅक्सवेलला संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. पण अष्टपैलूच्या त्या जागेसाठी अॅश्टन अॅगर आणि मार्क्स स्टॉईनिसची नावंही चर्चेत आहेत. पण तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलिया लेग स्पिनर मिचेल स्वेपसनला संधी देते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ऑफ स्पिनर नॅथन लायनच्या उजव्या हाताचं दुसरं बोट सोलून निघालं आहे. पण त्या दुखापतीवर उपचार घेऊन तो हट्टाने रांचीच्या मैदानात उतरेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्ल 9 लाखांचे पाचशे नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्ल 9 लाखांचे पाचशे नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde Virar : विरारमध्ये तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; राजन नाईक, क्षितीज ठाकूरांमध्ये वादHitendra Thakur On Vinod Tawde : 'भाजपवाल्यांनीच सांगितलं की विनोद तावडे 5 कोटी घेऊन येतायत'Uddhav Thackeray : भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट राज्यातून संपू देVinod Tawade:निवडणूक आयोग तुमचा घरगडी म्हणून काम करतंय,Sushma Andhare यांचा आरोप Prasad Lad खडाजंगी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्ल 9 लाखांचे पाचशे नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्ल 9 लाखांचे पाचशे नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
Vinod Thakur: विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूरांची बाचाबाची, डायरी दाखवली, कार्यकर्ते म्हणाले, लाईट का बंद केली?
विनोद तावडेंनी गळ्याला हात लावून शपथ घेतली, क्षितिज ठाकूरांनी डायरी दाखवली, विरारमध्ये राडा
Vinod Tawde: माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
Chandgad Vidhan Sabha : तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
Shrinivas Pawar : बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
Embed widget