एक्स्प्लोर

Ind vs Zim T20 World Cup 2026 : ‘संजू सॅमसनमुळेच…’; झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर तिलक वर्मा काय म्हणाला? VIDEO व्हायरल

India vs Zimbabwe T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026 मधील पहिल्या पाच डावांत एकूण 107 धावा… स्ट्राइक रेटवर प्रश्नचिन्ह… झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी तिलक वर्मा प्रचंड दबावाखाली होता.

Tilak Varma India vs Zimbabwe T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026 मधील पहिल्या पाच डावांत एकूण 107 धावा… स्ट्राइक रेटवर प्रश्नचिन्ह… झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी तिलक वर्मा प्रचंड दबावाखाली होता. त्याच्या बॅटमधून मोठी खेळी येत नव्हती आणि टीकेची झोड वेगळीच उठली होती. मात्र, चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर टीम मॅनेजमेंटने तिलकच्या फलंदाजी क्रमात बदल करण्याचा घेतलेला निर्णय अचूक ठरला. ऑर्डरमधील डिमोशन हेच तिलकसाठी परफॉर्मन्समधील प्रमोशन ठरले.

फॉर्ममध्ये पुनरागमन

झिम्बाब्वेविरुद्ध तिलकने तुफानी फलंदाजी करत केवळ 16 चेंडूत नाबाद 44 धावांची धमाकेदार खेळी केली. तब्बल 275 च्या स्ट्राइक रेटने खेळताना त्याने 3 चौकार आणि 4 षटकार ठोकले. याआधी स्पर्धेत तो तिसऱ्या क्रमांकावर खेळत होता. त्या स्थानावर त्याने 25, 25, 25, 31 आणि 1 अशा धावा केल्या होत्या. मात्र या सामन्यात त्याला सहाव्या क्रमांकावर पाठवण्यात आले आणि हा प्रयोग त्याच्यासाठी वरदान ठरला.

संजू सॅमसनचे कौतुक

सामन्यानंतर तिलकने पत्रकार परिषदेत सर्व मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य केले आणि सलामीवीर संजू सॅमसनचे भरभरून कौतुक केले. त्याने विजयाचे श्रेय सलामीवीरांना देताना म्हटले, “ओपनर्स चांगली सुरुवात करून देतात, तेव्हा तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या फलंदाजांचा आत्मविश्वास वाढतो. आज संजू सॅमसनने जे केले, ते अप्रतिम होते. त्यानंतर आम्ही सर्वांनी त्याच पद्धतीने खेळ पुढे नेला. पॉवरप्लेमध्ये 3-4 विकेट्स पडल्या तरी आपली आक्रमक शैली बदलायची नाही, अशी टीममध्ये चर्चा झाली होती. आम्ही प्रत्येक चेंडूवर फटके मारण्यास तयार आहोत, हे प्रतिस्पर्ध्यांना दाखवायचे होते.”

स्वतःच्या भूमिकेबाबत स्पष्ट मत

स्वतःच्या फलंदाजीबाबत तिलक म्हणाला, “संघाला ज्या गोष्टीची गरज असेल, ते करण्यासाठी मी कायम तयार असतो. गेली चार वर्षे मी मुंबई इंडियन्ससाठी हीच भूमिका पार पाडत आलो आहे. भारतीय संघासाठीही अशा परिस्थितीत मी काही सामने खेळलो आहे. त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी नवी नाही. मला फक्त एका चांगल्या डावाची प्रतीक्षा होती आणि देवाचे आभार की ती संधी आता मिळाली. योग्य वेळी ही खेळी आली असून पुढेही मी संघाला विजय मिळवून देऊ शकतो, असा मला विश्वास आहे.” (Tilak Verma India vs Zimbabwe T20 World Cup 2026)

हे ही वाचा -

India Semi-Final Scenario : खराब नेट रन रेटमुळे टीम इंडिया जाणार स्पर्धेतून बाहेर?, वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी धक्कादायक समीकरण, सगळेच चक्रावले

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
NZ vs SA Semifinal T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’; न्यूझीलंडची टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक; फिन अ‍ॅलनने ठोकले रेकॉर्डब्रेक शतक
दक्षिण आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’; न्यूझीलंडची टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक; फिन अ‍ॅलनने ठोकले रेकॉर्डब्रेक शतक
IND vs ENG T20 World Cup Semi Final : ईशान अन् संजू सलामीवीर, तर अभिषेक OUT? इंग्लंडविरुद्ध अशी असणार टीम इंडियाची Playing-11, कोच स्पष्टच बोलला
ईशान अन् संजू सलामीवीर, तर अभिषेक OUT? इंग्लंडविरुद्ध अशी असणार टीम इंडियाची Playing-11, कोच स्पष्टच बोलला
IND vs ENG T20 World Cup Semi Final : जिंकण्याची कोणतीच हमी नाही...; इंग्लंडविरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाच्या कोचचं धक्कादायक विधान, नेमकं काय म्हणाला?
जिंकण्याची कोणतीच हमी नाही...; इंग्लंडविरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाच्या कोचचं धक्कादायक विधान, नेमकं काय म्हणाला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget