एक्स्प्लोर
Advertisement
IndvsAus - भारत पराभवाच्या छायेत
पुणे: पुणे कसोटीत टीम इंडिया पराभवाच्या छायेत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 441 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं असून त्याचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात भारताचा निम्मा संघ 89 धावांतच माघारी परतला आहे. भारताच्या अवघ्या 99 धावात 6 विकेट गेल्या आहेत.
मुरली विजय, लोकेश राहुल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवीचंद्रन अश्विन आणि रिद्धीमान साहा स्वस्तात बाद झाल्यानं टीम इंडिया संकटात सापडली आहे.
या कसोटीत ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 155 धावांची आघाडी घेतली होती. मग आज तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथनं शतक साजरं केलं. त्यामुळं कांगारूंना दुसऱ्या डावात 285 धावांची मजल मारता आली. स्मिथनं 109 धावांची खेळी केली तर भारताकडून अश्विननं चार आणि जाडेजानं तीन विकेट्स काढल्या.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव आटोपला, भारतासमोर 441 धावांचं लक्ष्य
ऑस्ट्रेलियाने आज 4 बाद 143 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. रवींद्र जाडेजाने मिचल मार्शला (31) बाद करुन पाचवा, तर उमेश यादवने मॅथ्यू वेडला तंबूत पाठवत ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का दिला. मात्र दुसरीकडे कर्णधार स्टीव्ह स्मिथ खिंड लढवत होता. स्मिथने आधी रेन शॉ आणि मग मार्शच्या साथीने शतकाकडे वाटचाल केली. स्मिथने 187 चेंडूत खणखणीत शतक झळकावलं. स्मिथचं हे कसोटीतील 18 वं तर भारताविरुद्धचं पाचवं शतक आहे. तर कर्णधारपदी विराजमान झाल्यापासून हे त्याचं दहावं शतक आहे. शतकानंतर स्मिथने हात खोलून फटकेबाजीला सुरुवात केली. मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात तो तंबूत परतला. स्मिथला जाडेजाने पायचित केलं. यानंतर मग मिचेल स्टार्कला (30) अश्विनने, नॅथन लायनला (13) उमेश यादवने तर ओकिफी (6) जाडेजाने माघारी धाडत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. ऑस्ट्रेलियाचं हे भलं मोठं लक्ष्य दोन दिवसात पेलण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. त्यामुळे दोन दिवस भारतीय फलंदाज मैदानात उभी राहते का ते पाहणं महत्त्वाचं आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement