एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारत आणि ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या वन डेसाठी ईडन गार्डन्स सज्ज
टीम इंडियानं चेन्नईची पहिली वन डे जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
कोलकाता : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला दुसरा वन डे सामना उद्या कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येत आहे. टीम इंडियानं चेन्नईची पहिली वन डे जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
चेन्नईच्या पावसानं पहिल्या वन डेत ऑस्ट्रेलियाला खरं तर ट्वेन्टी ट्वेन्टीला साजेसं आणि पाठलागासाठीही सोपं लक्ष्य दिलं होतं. पण सरशी टीम इंडियाचीच झाली.
चेन्नईच्या त्या वन डेत कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल या मनगटी फिरकी गोलंदाजांनी चेन्नईच्या वन डेत गाजवलेलं वर्चस्व लक्षात घेता ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी उर्वरित सामन्यांमध्येही त्यांचा धसका घेतलेला दिसला, तर आश्चर्य वाटायला नको.
हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार या मध्यमगती गोलंदाजांनीही पहिल्या वन डेत आपली भूमिका चोख बजावली. त्यामुळंच विजयासाठी 21 षटकांत 164 धावांचं माफक आव्हानही कांगारूंना डोईजड ठरलं.
टीम इंडियानं चेन्नईत ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय हा दिसायला एकतर्फी असला तरी भारतीय फलंदाजांनाही या सामन्यात संघर्ष करावा लागला. नॅथन कूल्टर नाईल आणि मार्कस स्टॉईनिसनं भारताचा निम्मा संघ ८७ धावांमध्येच माघारी धाडला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताच्या प्रमुख फलंदाजांकडून कोलकात्यात सुधारित कामगिरीची अपेक्षा करण्यात येत आहे.
चेन्नईत टीम इंडिया संकटात असताना महेंद्रसिंग धोनीनं आधी हार्दिक पंड्या आणि मग भुवनेश्वर कुमारच्या साथीनं रचलेल्या भागिदाऱ्यांनी टीम इंडियाला पाच बाद 87 धावांवरून सात बाद 281 धावांची मजल मारून दिली होती.
वास्तविक धोनीचा वन डे क्रिकेटमधला प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्याच्याकडून या कामगिरीची अपेक्षा होतीच, पण हार्दिक पंड्याची चेन्नईत दिसलेली अष्टपैलू प्रतिभा ही टीम इंडियाला आशेचा नवा किरण दाखवणारी आहे. पंड्यानं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर केलेलं यशस्वी आक्रमण प्रामुख्यानं लेग स्पिनर अॅडम झॅम्पावर मानसिक आघात करणारं ठरलं. त्यामुळं कोलकात्याच्या वन डेत भारताच्या सखोल फलंदाजीला लगाम घालण्यासाठी स्टीव्हन स्मिथ काय रणनीती आखतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरावं.
चेन्नईपाठोपाठ कोलकात्याच्या दुसऱ्या वन डेवरही पावसाचं सावट आहे. पण मंगळवारी कोलकात्यात पावसानं घेतलेली विश्रांती आणि ईडन गार्डन्सवरच्या सुविधा लक्षात घेता या वन डेत षटकांची संख्या कमी करून सामना होण्याचीच शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
करमणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement