एक्स्प्लोर
Advertisement
पंतकडून कॅच सुटला आणि विश्वविक्रम हुकला
105 व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पंतने लायनचा झेल सोडला आणि विश्वविक्रमाची संधी गमावली. जर पंतने हा झेल पकडला असता तर 12 झेलसह अव्वल स्थान गाठले असते
अॅडलेड : भारत-ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक रिषभ पंतने नव्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत यष्टिमागे तब्बल अकरा झेल घेत सर्वाधिक झेल घेण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. पण 105 व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पंतने लायनचा झेल सोडला आणि विश्वविक्रमाची संधी गमावली. जर पंतने हा झेल पकडला असता तर 12 झेलसह अव्वल स्थान गाठले असते.
रिषभ पंतने या कामगिरीसह इंग्लंडचा जॅक रसेल आणि दक्षिण आफ्रिकेच्या ए बी डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रसेलनं आणि डिव्हिलियर्सनं अनुक्रमे 1995 आणि 2013च्या जोहान्सबर्ग कसोटीत यष्टिमागे अकरा झेल घेतले होते. पंतने या विक्रमाची बरोबरी करताना अॅडलेडवर पहिल्या डावात सहा तर दुसऱ्या डावात पाच झेल टिपले.
तसेच आतापर्यंत एकाही भारतीय यष्टीरक्षकालाही अशी कामगिरी करता आलेली नाही. यापूर्वी 10 झेल घेत साहा प्रथम क्रमांकावर होता. तर 9 झेलसह धोनी दुसऱ्या स्थानावर होता. मात्र, पंतने या कसोटी सामन्यात 11 झेल घेत हा विक्रम आपल्या नावावर करुन घेतला.Congratulations, Rishabh Pant!
He has taken 11 catches in the match – the most in a Test for India – and has equalled the all-time record of Jack Russell and AB de Villiers. #AUSvIND LIVE ⬇️https://t.co/sCMk42Mboc pic.twitter.com/ed5hSieOBS — ICC (@ICC) December 10, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement