एक्स्प्लोर
चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीत पाकला लोळवलं ; भारताची दमदार सुरुवात
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या हॉकीत भारतीय पुरुषांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. पण हॉलंडमध्ये आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरुवातच्या सामन्यात भारतीय संघानं केलेली कामगिरी चाहत्यांचा उत्साह वाढवणारी आहे.

ब्रेडा : नेदरलँडमध्ये सुरु असलेल्या चॅम्पियन ट्रॉफीत काल झालेल्या सलामीच्या सामन्यात भारताने दमदार कामगिरी करत पाकिस्तानचा 4-0 ने धुव्वा उडवला. भारतासाठी रमणदीपसिंग, दिलप्रीतसिंग, मनदीपसिंग आणि ललित उपाध्यायनं प्रत्येकी एका गोलची नोंद केली. सामन्यातील चौथ्या मिनिटाला भारताला गोल करण्याची संधी मिळाली होती. पण रमणदीपला गोल करण्यास अपयश आले. त्यानंतर 14 व्या आणि 16 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण याही वेळी भारतीय खेळाडू अपयशी ठरले. अखेर 25 व्या मिनिटाला गोल करत रमणदीपने भारताला खाते उघडून दिले. त्यानंतर 54 व्या मिनिटाला दिलप्रीतने, 57 व्या मिनिटाला मनदीप सिंहने तर 59 व्या मिनिटाला ललित उपाध्यायने गोल केल्याने भारताने सामन्यावर एकहाती वर्चस्व गाजवले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या हॉकीत भारतीय पुरुषांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. पण हॉलंडमध्ये आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरुवातच्या सामन्यात भारतीय संघानं केलेली कामगिरी चाहत्यांचा उत्साह वाढवणारी आहे. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा पुढील सामना अर्जेंटिनाच्या संघाबरोबर होणार आहे.
आणखी वाचा























