IND vs SL, Mohali Test : कोहलीविषयी केलेली भविष्यवाणी खरी ठरली; शंभराव्या कसोटीत विराटच्या 45 धावा, लसिथ एम्बुलडिनियाने केलं बोल्ड
IND vs SL, Mohali Test : माजी कर्णधार विराट कोहली 100 व्या कसोटी सामन्यात 45 धावांवर बाद होण्याची भविष्यवाणी एक दिवस अगोदरच करण्यात आली होती.
IND vs SL : मोहालीत आजपासून भारत वि. श्रीलंका पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना माजी कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) खास आहे. कारण विराटसाठी ही त्याच्या कारकीर्दीतली शंभरावी कसोटी आहे. विराटने आपल्या शंभराव्या कसोटीमध्ये 45 धावा केल्या आहेत. विराटने पाच चौकरांसह 45 धावा केल्या आहेत. कोहलीला स्पिनर लसिथ एम्बुलडेनियाने बोल्ड केले. परंतु विराट कोहली 100 व्या कसोटी सामन्यात 45 धावांवर बाद होण्याची भविष्यवाणी एक दिवस अगोदरच करण्यात आली होती. आश्यर्याची गोष्ट म्हणजे ही भविष्यवाणी खरी ठरली आहे.
श्रुती नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून सामना सुरू होण्याअगोदर जवळपास 10 तास अगोदर भविष्यवाणी करण्यात आली होती. 100 व्या कसोटी सामन्यात विराट 45 धावा करेल आणि त्याला एम्बुलडेनिया बाद करेल. बाद झाल्यानंतर विराट नाराज झाला.
Kohli Won't score a 100 in his 100th test. Will score 45 (100) with 4 gorgeous cover drives and then Embuldeniya will knock his stumps over and he'll pretend to be shocked 😳😳 and will nod his head in disappointment
— shruti #100 (@Quick__Single) March 3, 2022
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजीसाठी उतरलेल्या विराट कोहलीच्या बाबतीत ज्या पद्धतीने ट्वीटमध्ये लिहिले त्याप्रमाणे घडले आहे. दरम्यान ट्विटमध्ये लिहिले होते की, कोहली 100 चेंडूमध्ये 45 धावा करणार परंतु कोहलीने 76 चेंडूमध्ये 45 धावा केल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये आठ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा भारताचा सहावा खेळाडू आहे. कोहलीने आपल्या 100व्या कसोटीच्या 169व्या डावात 8000 धावा पूर्ण केल्या. याशिवाय 100 व्या कसोटीत आठ हजार धावांना गवसणी घालणारा विराट हा ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉण्टिंगनंतरचा दुसराच खेळाडू आहे.
संबंधित बातम्या:
- IND vs SL Test : शंभर नंबरी 'विराट'; कोहलीचा 100वा कसोटी सामना, रोहित शर्मासाठीही महत्त्वाचा दिवस
- विराट 100 व्या कसोटी सामन्यासाठी सज्ज, शतकाची प्रतिक्षा संपणार
- Virat Kohli 100th Test: विराटचा 100 वा कसोटी सामना तुम्हीही पाहू शकता, प्रेक्षकांच्या उपस्थितीवरील निर्बंध शिथिल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha