एक्स्प्लोर
Mumbai Monorail Accident : मोनोरेलचा कारभार, अडचणींचा सिग्नल? Special Report
मुंबईत चेंबूर ते वडाळा (Chembur to Wadala) मार्गावर मोनोरेलच्या (Mumbai Monorail) चाचणी दरम्यान झालेल्या अपघातामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वडाळा डेपोजवळ एका नव्या रेकची चाचणी सुरु असताना हा अपघात झाला. 'हा अपघात आहे सरळ, सरळ... महामुंबई मेट्रो प्रशासनाला हे जो चालवायला दिलेला आहे यांना कोणताही पूर्वानुभव नसतानादेखील चालवायला दिलेलं आहे हे फार मोठा अपयश आहे', असा आरोप करत प्रशासनाच्या मॉक ड्रिलच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. घटनेच्या वेळी मोनोरेलचा पुढचा डबा रुळ सोडून बाहेर आला, पण सुदैवाने खांबावर अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातानंतर, MMRDA ने स्पष्टीकरण देताना हा अपघात नसून, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी केलेला एक 'मॉक ड्रिल' होता असे म्हटले आहे. मात्र, या घटनेमुळे मोनोरेलच्या कारभारावर आणि प्रवाशांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Flood Help : अतिवृष्टी अहवाल...खरं कोण, खोटं कोण? Special Report

Amruta Fadnavis On Devendra Fadnavis : युतीचा घटस्फोट, नवा गोप्यस्फोट Special Report

Sangli Ashta EVM Scam : वाढला टक्का, सांगलीत खटका; मतदानामध्ये तफावत, राजकीय आफत Special Report

Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report

Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion




























