एक्स्प्लोर
Virat Kohli Birthday : हॅप्पी बर्थडे 'किंग कोहली’, जाणून घ्या कसा होता विराटचा प्रवास!
Virat Kohli Birthday : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विराट कोहली, जाणून घ्या कसा होता ‘चीकू’ ते ‘किंग कोहली’ चा प्रवास.
Virat Kohli Birthday
1/12

भारतीय क्रिकेट जगातील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी खेळाडूंमध्ये 'विराट कोहली' हे एक नाव सर्वांच्या तोंडी आहे
2/12

विराट कोहली त्याच्या मेहनतीने, शिस्तबद्ध जीवनशैलीने आणि जिद्दीने तो 'चीकू' पासून 'किंग कोहली' बनला.
3/12

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि कर्णधार विराट कोहली आज आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे.
4/12

त्याला सुरुवातीच्या काळात सहकारी खेळाडू 'चीकू' या टोपणनावाने हाक मारायचे. हे नाव त्याला ‘चंपक’ या कॉमिकमधील एका पात्रावरून मिळाले होते.
5/12

विराटने 20 ऑगस्ट 2008 रोजी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. केवळ चार वर्षांच्या आत तो भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य बनला.
6/12

थोड्याच काळात तो जगातील सर्वात फिट क्रिकेटपटूंपैकी एक बनला. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक ऐतिहासिक सामने जिंकले.
7/12

जरी त्याच्या कर्णधारपदात भारताने ICC ट्रॉफी जिंकली नाही, तरी त्याने अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले. 2014 मध्ये त्याला टेस्ट संघाचं नेतृत्व दिलं गेलं.
8/12

त्याच्या कर्णधारपदात भारताने परदेशी मैदानावर देखील विजय मिळवले. भारत टेस्ट क्रिकेटमध्ये क्रमांक 1 चा संघ बनला.
9/12

भारताने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. विराटने 68 टेस्ट सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आणि त्यात 40 विजय मिळवले.
10/12

तो भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टेस्ट कर्णधार ठरला. सध्या तो फक्त वनडे फॉर्मॅटमध्ये खेळताना दिसतो.
11/12

2025 मध्ये RCB ने IPL विजेतेपद जिंकलं, त्या क्षणी विराटच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण 18 वर्षांची प्रतीक्षा संपली आणि चाहत्यांचं 'ए साला कप नम दु' हे स्वप्न अखेर खरं ठरलं.
12/12

‘चीकू’ ते ‘किंग कोहली’ असा विराटचा प्रवास जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
Published at : 05 Nov 2025 02:59 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
क्राईम
पुणे
महाराष्ट्र


















