IND vs AUS World Cup 2023 LIVE Score :इशान किशन 0, रोहित 0, श्रेयस अय्यर 0, ऑस्ट्रेलियाचा पहिल्या दोन ओव्हरमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक'
भारताच्या जडेजा आर. आश्विन आणि कुलदीप या त्रिकूटाने केलेल्या दमदार कामगिरीचा जोरावर ऑस्ट्रेलियाला अवघ्या 199 धावांत गुंडाळले. 200 मापक आव्हान घेऊन उतरलेल्या भारताची सुरवात अत्यंत निराशाजनक झाली.
IND vs AUS World Cup 2023 LIVE Score : वर्ल्डकपमध्ये पहिल्या सलामीच्या लढतीत टीम इंडियाने दमदार सुरुवात करताना बलाढ्य ऑस्ट्रेलियाला अवघ्या 200 धावांत गुंडाळले. फलंदाजीमध्ये मात्र दाणादाण उडाली आहे. पहिल्या पहिल्या तीन षटकांमध्येच तीन बाद पाच अशी भारताची अवस्था झाली. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा, ईशान किशन आणि त्यानंतर आलेला श्रेयस सुद्धा अगदी खातं न उघडताच तांबूत परतल्याने भारताची अवस्था तीन बाद पाच अशी झाली.
Duck for Kishan.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 8, 2023
Duck for Rohit Sharma.
Duck for shreyas Iyer.
India 2/3 in the World Cup against Australia. pic.twitter.com/vOaFA9JXE2
तत्पूर्वी, भारताच्या जडेजा आर. आश्विन आणि कुलदीप या त्रिकूटाने केलेल्या दमदार कामगिरीचा जोरावर ऑस्ट्रेलियाला अवघ्या 199 धावांत गुंडाळले. 200 मापक आव्हान घेऊन उतरलेल्या भारताची सुरवात अत्यंत निराशाजनक झाली. त्यामुळे पुन्हा एकदा 2019 वर्ल्डकपच्या पहिल्या लढतीची आठवण झाली आहे. त्यावेळी सुद्धा न्यूझीलंडविरोधात भारताला तीन बाद पाच असा सामना करावा लागला होता. त्यावेळी भारताने हा सामना गमावला होता. त्यामुळे आजच्या लढतीत आता मैदानात विराट कोहली, लोकेशन राहुल असून ते कशी लढत देतात यावर सामन्याचं चित्र अवलंबून असेल.
2019 World Cup 🤝 2023 World Cup. pic.twitter.com/AI5vJi1wv2
— Johns. (@CricCrazyJohns) October 8, 2023
ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कने चौथ्याच चेंडूवर इशान किशनला भोपळाही फोडू न देता माघारी धाडले. त्यानंतर दुसऱ्या षटकात हेजलवुडने तगडा हादरा दिला. कप्तान रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरला एकाच ओव्हरमध्ये माघारी धाडत भारताची अवस्था 3 बाद 5 अशी करून टाकली.
गेल्या 27 वर्षात सलामीला ऑस्ट्रेलिया कधीच पराभूत नाही
दुसरीकडे, सर्वाधिक वर्ल्डकपवर नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलियाने (They won their first match of the World Cup in 6 straight editions) 1996 पासून ते आतापर्यंत कधीच वर्ल्डकपची सलामीची मॅच गमावलेली नाही. त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चालत विजयाचा श्रीगणेशा केला आहे. त्यामुळे अशा बलाढ्य असलेल्या ऑस्ट्रेलियासमोर आज टीम इंडिया 27 वर्षांची पहिल्या लढतीमधील विजयी मालिका मोडित काढणार की ऑस्ट्रेलिया बाजी मारणार? याचे उत्तरही आज मिळणार आहे. यापूर्वी 1996 च्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया पराभूत झाला होता. मात्र, त्यानंतर आजवरच्या सलग सहा वर्ल्ड कपमध्ये आपली पहिली मॅच जिंकूनच दमदार सलामी दिली आहे. यामध्ये 1999, 2003, 2007, 2011, 2015, 2019 अशा सलग सहा वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने प्रतिस्पर्धी संघाला मात दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या