(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS Second ODI: टीम इंडिया पुन्हा अडचणीत, विराट कोहलीची बॅट सिडनीमध्ये शांतचं, आकडेवारी पहा
विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरोधात सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. कर्णधार कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 39 डावांमध्ये 1931 धावा केल्या आहेत. मात्र, त्याची बॅट सिडनीमध्ये आतापर्यंत शांत पाहायला मिळाली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना उद्या सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून 66 धावांनी पराभव झाला. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला कर्णधार विराट कोहलीकडून बरीच आशा होती पण तो केवळ 21 धावा करून बाद झाला.
कोहलीची बॅट सिडनीमध्ये चालत नाही जगभरातील मैदानांवर शतकं ठोकणाऱ्या विराट कोहलीची बॅट सिडनीमध्ये शांत राहिलेली आहे. या मैदानावर कोहलीने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. तेही फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्धच. यात अनुक्रमे 21, नाबाद 3, 1, 8, 3 आणि 21 धावा केल्या आहेत. या मैदानावर कोहलीने 89 चेंडूचा सामना केला. पैकी 57 चेंडूवर धावा काढण्यात तो यशस्वी झालाय. येथे खेळल्या गेलेल्या सहा सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने चार वेळा विजय मिळविला, तर एक सामना पावसामुळे रद्द करावा लागला. तर 2016 मध्ये केवळ मनीष पांडेने शतकी खेळी केल्याने भारताचा विजय झाला होता.
दरम्यान, विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरोधात सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. कर्णधार कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 39 डावांमध्ये 1931 धावा केल्या आहेत. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 शतके आणि तेव्हढीचं अर्धशतके झळकावली आहेत.
IND vs AUS : ऑस्ट्रेलियात कोरोनाची नाही तर क्रिकेटची लाट
ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड खूपच खराब एकदिवसीय सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया 141 वेळा एकमेकांशी भिडले आहेत. यात कांगारू संघाने 79 वेळा, तर भारतीय संघाने 52 सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारतीय संघाने कांगारू संघाविरूद्ध 52 एकदिवसीय सामने खेळले असून टीम इंडियाने केवळ 13 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाचा 37 सामन्यांत ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जिंकण्यासाठी भारताला खूप संघर्ष करावा लागणार आहे.