Sam Konstas Vs Virat Kohli : पहिल्याच सामन्यात किंग कोहलीला भिडला, भर मैदानातील वादावर ऑस्ट्रेलियाच्या कॉन्स्टासनची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाला...
विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात भर मैदानात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. या वादानंतर खुद्द कॉन्स्टास यांने प्रतिक्रिया देत नेमकं काय घडलं होतं, याबाबत माहिती दिली आहे.
Sam Konstas vs Virat Kohli : ऑस्ट्रेलियचा तरुण खेळाडू सॅम कॉन्स्टास आणि भारताचा विराट कोहली यांच्यात भर मैदानात वाद झाला. विराट कोहलीने कॉन्स्टासला धक्का दिला, त्यामुळेच दोघांमध्ये काही काळासाठी वाद झाला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनंतर क्रिकेटप्रेमींमध्ये संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. या घटनेवर आता खुद्द सॅम कॉन्स्टास यानेच प्रतिक्रिया दिली आहे.
वादानंतर क्रिकेटप्रेमींमध्ये संमिश्र प्रतिक्रिया
विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात झालेल्या प्रकारानंतर काही क्रिकेटप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. क्रिकेट हा एक खेळ आहे. त्यामुळे अशा ठिकाणी वैयक्तिक राग काढू नये.
एखाद्या नव्या खेळाडूला अशा प्रकारची वागणूक देणे बरे नाही, अशा भावना काही लोकांनी व्यक्त केल्या आहेत. तर काही लोकांनी क्रिकेटर विराट कोहलीची पाठ थोपटली आहे. त्यानंतर आता या प्रकारावर सॅम कॉन्स्टासने आपली भूमिका मांडली आहे. आम्ही दोघांनीही आपल्या-आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळेच तो प्रकार घडला. मात्र हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अशा प्रकार घढतातच, असे स्पष्टीकरण सॅम कॉन्स्टासनने दिले.
An exchange between Virat Kohli and Sam Konstas.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 26, 2024
- THE BOXING DAY TEST IS HERE.pic.twitter.com/x8O4XCN1Sj
मैदानावर नेमं काय घडलं होतं?
खरं म्हणजे सॅम कॉन्स्टास याचा हा पहिलाच सामना होता. त्याने या सामन्यात दमदार फलंदाजी क्ली. या सामन्याच्या 11 व्या षटकात त्याचा विराट कोहलीसोबत वाद झाला. भारताचे दिग्गज गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रित बुमराह यांनी टाकलेल्या चेंडूंवर जोरदार फटके मारत होता. याच षटकादरम्यान, विराट कोहलीने खेळपट्टीवरील चेंडू उचलून घेतला आणि तो सॅम कॉन्स्टासच्या दिशेने गेला. त्यानंतर पुढच्या काही सेकंदांत हे दोघेही एकमेकांना धडकले. या घटनेचा व्हिडीओ पाहून विराट कोहलीनेच सॅम कॉन्स्टासला धडक दिली आहे, असे मत व्यक्त केले जात आहे. या धडकेनंतर सॅम कॉन्स्टास आणि विराट कोहली यांच्यात वाद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा फलंदाज आणि पंचांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवले.
हेही वाचा :