Virat Kohli for Sam Konstas : विराट कोहलीवर लागणार बॅन? 19 वर्षाच्या पोरांसोबत भर मैदानात भिडला, काय सांगतो ICC चा नियम?
मेलबर्न येथे खेळल्या जात असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहली आणि 19 वर्षीय सॅम कॉन्स्टास यांच्यात बाचाबाची झाली.
Virat Kohli for Sam Konstas Ind vs Aus 4th Test : मेलबर्न येथे खेळल्या जात असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहली आणि 19 वर्षीय सॅम कॉन्स्टास यांच्यात राडा पाहायला मिळाला. सामन्यादरम्यान, पंचांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत केले. पण या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सॅम कॉन्स्टासला धक्का मारल्याबद्दल आयसीसी विराटला काही शिक्षा देऊ शकते का, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. आयसीसीचा कोणता नियम आहे ज्या अंतर्गत कोहलीला दोषी ठरवले जाऊ शकते ते जाणून घेऊया...
मैदानावर नेमकं काय घडलं?
खरंतर, जसप्रीत बुमराह डावाच्या 11व्या षटकात गोलंदाजी करत होता. पदार्पण करणारा ऑस्ट्रेलियन स्टार सॅम कॉन्स्टन्स केवळ मोहम्मद सिराजवरच नव्हे तर बुमराहच्या बॉलिंगवरही मोठे शॉट मारत होता. अशा स्थितीत 11व्या षटकात विराट कोहली कॉन्स्टसच्या दिशेने जात असताना दोघांची टक्कर झाली. व्हिडीओ नीट पाहिल्यानंतर विराट स्वत: बॉल उचलल्यानंतर कॉन्स्टासच्या दिशेने गेला आणि दोघांमध्ये धडक झाल्याचे दिसून आले. आता विराट कोहलीने हे जाणूनबुजून केले की चुकून झाले, याची चौकशी आयसीसी करेल.
Virat Kohli and Sam Konstas exchanged a heated moment on the MCG. #AUSvIND pic.twitter.com/QL13nZ9IGI
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2024
पाँटिंगच्या मते विराटची चूक
आता या प्रकरणाबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यासाठी ICC प्रथम घटनेची चौकशी करेल. पण, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला आधीच वाटत आहे की ही चूक विराट कोहलीची आहे. पॉन्टिंगने चॅनल 7 वर सांगितले की, विराट खेळपट्टीवर चालत होता, यावरून त्याचा हेतू दिसून येतो. मला खात्री आहे की ही त्याची चूक आहे. आता काय झाले ते पंच आणि रेफ्रींनी देखील पाहिले असेल.
आयसीसीचा नियम काय म्हणतो?
आयसीसीच्या नियमांनुसार, क्रिकेटच्या मैदानात किंवा मैदानावरील इतर कोणत्याही व्यक्तीशी अनुचित शारीरिक संबंध केल्यास त्याला शिक्षा होऊ शकते. अशा घटनांमध्ये खेळाडूला लेव्हल 2 अंतर्गत दोषी मानले जाते. तपासात विराट किंवा कॉन्स्टसपैकी कोणाचीही चूक आढळून आली तर 3 त्याला ते 4 डिमेरिट पॉइंट्सचे परिणाम भोगावे लागू शकतात.
क्रिकेटच्या इतिहासात याआधीही अशा घटना घडल्या आहेत आणि इतिहास पाहिला तर कोहलीला एका सामन्याची बंदी किंवा निलंबनासारखी कोणतीही शिक्षा झालेली नाही. पण, सामनाधिकारी निश्चितपणे त्यांच्या सामना शुल्कात कपात करू शकतात.
हे ही वाचा -