एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

IND vs AUS 3rd Test 4th Day : टीम इंडिया विजयापासून दोन विकेट्स दूर

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 399 धावांचं आव्हान दिलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही भारतीय आक्रमणासमोर लोटांगण घातलं. पण कमिन्स आणि लायन या जोडीनं नवव्या विकेटसाठी अभेद्य 43 धावांची भागीदारी करत भारताचा विजय लांबवला.

मेलबर्न : पॅट कमिन्स आणि नॅथन लायनच्या झुंजार भागिदारीमुळे मेलबर्न कसोटीत टीम इंडियाला विजयासाठी पाचव्या दिवसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसअखेर आठ बाद 258 धावांची मजल मारली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला अजूनही जिंकण्यासाठी 141 धावांची गरज आहे. तर भारत विजयापासून दोन विकेट्स दूर आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 399 धावांचं आव्हान दिलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही भारतीय आक्रमणासमोर लोटांगण घातलं. पण कमिन्स आणि लायन या जोडीनं नवव्या विकेटसाठी अभेद्य 43 धावांची भागीदारी करत भारताचा विजय लांबवला. भारताकडून रविंद्र जाडेजानं तीन फलंदाजांना माघारी धाडल. जसप्रीत बुमरा आणि शमीने दोन तर ईशांत शर्माने एक विकेट घेतली. त्याआधी आजच्या पहिल्या सत्रात भारतानं दुसरा डाव आठ बाद 106 धावांवर घोषित केला. तिसरा दिवस टीम इंडियानं मेलबर्न कसोटीत पहिल्या डावात 292 धावांची मोठी आघाडी घेतली खरी, पण दुसऱ्या डावात भारताची पाच बाद 54 अशी दाणादाण उडाली. अर्थात या परिस्थितीतही या कसोटीवर टीम इंडियाचा वरचष्मा दिसून येत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताने एकूण 346 धावांची आघाडी मिळवली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी मयांक अगरवाल 28, तर रिषभ पंत सहा धावांवर खेळत होता. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनं दुसऱ्या डावात टीम इंडियाला एकापाठोपाठ एक दणके दिले. त्याने हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेला स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर जोश हेजलवूडनं रोहित शर्माला बाद करुन टीम इंडियाला पाचवा धक्का दिला. दुसरा दिवस ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या मेलबर्न कसोटीत दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने पहिला डाव सात बाद 443 धावांवर घोषित केला. पुजाराने कसोटी कारकीर्दीतलं आपलं सतरावं शतक साजरं केलं. पुजाराने 10 चौकारांसह 106 धावांची खेळी उभारली. तर कर्णधार कोहलीनं नऊ चौकारांसह 82 धावांचं योगदान दिलं. पुजारा आणि विराटनं तिसऱ्या विकेटसाठी 170 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर आलेल्या रोहित शर्मानंही 63 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने तीन आणि मिचेल स्टार्कने दोन फलंदाजांना माघारी धाडलं. तर नॅथन लायन आणि हेजलवूडनं प्रत्येकी एक विकेट घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात बिनबाद आठ धावांची मजल मारली होती. पहिला दिवस पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाने मयंक अगरवाल आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकांच्या जोरावर दोन बाद 215 धावांची मजल मारली होती. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार कोहली 47 तर पुजारा 68 धावांवर खेळत होता. विराट आणि पुजारानं तिसऱ्या विकेटसाठी रचलेली 92 धावांची अभेद्य भागीदारी आणि पदार्पणवीर मयांक अगरवालची अर्धशतकी खेळी हे पहिल्या दिवसाचं वैशिष्ट्य होतं. मयांकनं आठ चौकार आणि एका षटकारासह 76 धावांची खेळी उभारली. भारताचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून कर्नाटकच्या मयांक अगरवालनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Embed widget